क्रिकेट

ENG vs IND KL Rahul : इंग्लंड कसोटीत केएल राहूल नवा विक्रम; दिग्गजांच्या यादीत कोरलं नाव, जाणून घ्या...

मँचेस्टरमध्ये झालेल्या चौथ्या कसोटीसामन्या दरम्यान केएल राहूलने नवा विक्रम प्रस्थापित केला. त्यामुळे त्याला चक्क विराट कोहली आणि सुनील गावस्करांच्या रांगेत स्थान मिळाले आहे.

Published by : Team Lokshahi

मँचेस्टरमध्ये झालेल्या चौथ्या कसोटीसामन्या दरम्यान केएल राहूलने नवा विक्रम प्रस्थापित केला. त्यामुळे त्याला चक्क विराट कोहली आणि सुनील गावस्करांच्या रांगेत स्थान मिळाले आहे. भारत आणि इंग्लंडमध्ये दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरवात झाली असून केएल राहुलने यामध्ये दमदार कामगिरी केलेली आहे. मँचेस्टरच्या ऐतिहासिक ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या चौथ्या कसोटीदरम्यान केएल राहुलने आणखी एक मोठी कामगिरी केली आहे.

राहुलने इंग्लंडच्या धरतीवर आपल्या 1000 कसोटी धावा पूर्ण केल्या आहेत. या सामन्यादरम्यान राहुलने 11 वी धाव घेत नव्या विश्वविक्रमाला गवसणी घातली. प्रथम नाणेफेक जिंकून इंग्लंडने गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यात सलामीवीर केएल राहुलच्या आगमनानंतर अवघ्या 15 धावा काढल्यानंतर राहुलने 1000 धावांचा आकडा गाठला. त्यामुळे केएल राहुल आता सचिन तेंडुलकर सुनील गावस्कर, यांच्या रांगेत त्याला स्थान मिळाले आहे.

सध्या केएल राहुलचा क्रिकेटचा परफॉरमन्स खूप दमदार असून यावेळच्या मालिकेमध्ये 350 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. त्याने विश्वविक्रमासह इंग्लंडमध्ये 1000 धावांचा टप्पा पार केला. केएल राहुल 1000 धावा करणारा पाचवा भारतीय खेळाडू ठरला आहे. सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, विराट कोहली राहुल द्रविड यांनी 1000 धावांचा टप्पा पार केला होता. के एल राहुलने आतापर्यंतच्या कसोटी मालिकेमध्ये 4 शतके ठोकली असून 2 अर्धशतके केली आहेत. राहुलने इंग्लंडमध्ये आतापर्यंत 13 सामने खेळले आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Kolhapur : कोल्हापूरमध्ये 20 दिवसांच्या बाळाला दूध पाजतानाा महिलेचा मृत्यू

Ullu, ALTBalajiसह 25 OTT अ‍ॅप्सवर बंदी ; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरात पावसाळ्यातही पाणीटंचाई; नागरिकांची पाण्यासाठी भटकंती

Vasai Video Viral : 'ती' चुक पडली महागात, 4 वर्षीय चिमुरडीचा बाराव्या मजल्यावरुन तोल जाऊन करुण अंत; Video Viral