क्रिकेट

RCB VS DC IPL 2025 : "हे माझं घरचं मैदान आहे" दिल्लीच्या विजयानंतरचं केएल राहुलची RCBला ठसन; KL Rahul Viral Video

IPL 2025 RCB VS DC : केएल राहुलचा बंगळुरू मैदानावर विजयाचा जल्लोष, दिल्लीचा सलग चौथा विजय

Published by : Prachi Nate

काल बंगळूरुच्या एम. चिन्नस्वामी स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हा सामना रंगला. मूळचा बंगळुरूचा असलेल्या केएल राहुलने त्याच्या घरच्या मैदानावर आरसीबीविरूद्ध खेळताना दिल्लीने हरलेला सामना जिंकून दिला. या सामन्यादरम्यान केएल राहुलने एकट्याने वादळी खेळी खेळत दिल्लीच्या विजयाचा नायक ठरला. या सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे फलंदाजीसाठी बंगळुरू मैदानात उतरले.

तेव्हा फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 20 ओव्हर्समध्ये एकूण 164 धावांच आव्हान दिल्लीला दिलं. यावेळी आरसीबीकडून टीम डेव्हिड आणि फिलिप सॉल्ट यांनी चांगली खेळी खेळली. या धावांचा पाठलाग करत दिल्लीने हा सामना 17.5 ओव्हरमध्ये 4 बाद 169 धावांवर पार पाडला. दिल्लीचे गोलंदाज कुलदीप यादव आणि विप्रज निगम यांनी आरसीबीला 163 धावांवर रोखण्यासाठी चांगली साथ दिली. तर यामगचं सर्वात मोठ श्रेय केएल राहुलला देण्यात येत आहे. आरसीबीला पराभूत करत दिल्लीने यासह सलग चौथा विजय मिळविला.

केएल राहुलची मॅचविनिंग खेळी

या सामन्यात केएल राहुलने 53 बॉलमध्ये 93 नाबाद धावा केल्या. यावेळी त्याने 7 चौकारांसह 6 षटकार झळकावत नाबाद 93 धावांची खेळी खेळली. त्याने संघाच्या विजयाचा विचार केल्यामुळे, तो शतक पूर्ण करू शकला नाही. यासामन्यात तुफानी खेळी खेळल्यानंतर केएल राहुलची शेवटची सेलेब्रेशनवाली एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये केएल राहुलने आपली बॅट मैदानावर टेकवून गोल फिरवत जोरात आदळली. इतकचं नव्हे तर राहुलने खेळीनंतर खाली जमिनीकडे हात दाखवला आणि त्यानंतर स्वतःकडे बोट दाखवत खुणावलं की, हा माझं घरचं मैदान आहे, त्याचं होमग्राउंड असल्याचं खउणवत त्याने आरसीबीला इशारा करत खडसावल्याच पाहायला मिळालं.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा