क्रिकेट

IPL 2026 Auction : IPL 2026 चं ऑक्शन कधी आणि कुठे होणार जाणून घ्या ?

इंडियन प्रीमियर लीग ही जगातील सर्वात प्रसिद्ध टी 20 लीग असून याचा 19 वा सीजन पुढील वर्षी पार पडणार आहे. IPL 2026 साठी मंगळवार 16 डिसेंबरला मिनी ऑक्शन पार पडणार आहे.

Published by : Varsha Bhasmare

इंडियन प्रीमियर लीग ही जगातील सर्वात प्रसिद्ध टी 20 लीग असून याचा 19 वा सीजन पुढील वर्षी पार पडणार आहे. IPL 2026 साठी मंगळवार 16 डिसेंबरला मिनी ऑक्शन पार पडणार आहे. 10 संघांचा सहभाग यंदाच्या स्पर्धेत एकूण असणार असून यातील 77 जागांसाठी ऑक्शन होणार आहे. अबुदाबीमध्ये यंदाचं मिनी ऑक्शन हे होणार आहे.

कोणत्या टीमच्या पर्समध्ये आयपीएल 2026 च्या ऑक्शनसाठी किती पैसे?

कोलकाता नाइट रायडर्स (KKR) = 64.30 कोटी

चेन्नई सुपर किंग्स (CSK) = 43.40 कोटी

सनरायझर्स हैदराबाद (SRH) = 25.50 कोटी

लखनऊ सुपर जायंट्स (LSG) = 22.95 कोटी

दिल्ली कॅपिटल्स (DC) = 21.80 कोटी

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) = 16.40 कोटी

राजस्थान रॉयल्स (RR) = 16.05 कोटी

गुजरात टायटन्स (GT) = 12.90 कोटी

पंजाब किंग्स (PBKS) = 11.50 कोटी

मुंबई इंडियन्स (MI) = 2.75 कोटी

कोणत्या खेळाडूवर लागू शकते मोठी बोली? आयपीएल मिनी ऑक्शनमध्ये ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर कॅमरन ग्रीन हा सर्वात महागडा खेळाडू आहे. मात्र ऑक्शनमध्ये यापूर्वी देखील पाहिलंय की काहीही होऊ शकतं. वेंकटेश अय्यर, लियाम लिव्हिंगस्टोन आणि रवी बिष्णोई हे देखील सर्वात महागड्या खेळाडूंपैकी एक असू शकतात. संघांकडे खर्च करण्यासाठी भरपूर पैसे असल्याने, अनकॅप्ड आणि प्रतिभावान खेळाडूंनाही मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करण्यात येईल.

किती वाजता सुरु होणार ऑक्शन? मिनी ऑक्शन 16 डिसेंबरला IPL 2026 साठी मंगळवार पार पडणार आहे. हे ऑक्शन दुपारी 2:30 वाजता भारतीय प्रमाणवेळेनुसार सुरु होईल. ऑक्शनमध्ये 350 खेळाडूंना यंदा सिलेक्ट करण्यात आले आहे. आपल्या संघात यापैकी कोणत्या 77 खेळाडूंना फ्रेंचायझी घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कुठे पाहू शकता ऑक्शन? मंगळवार 16 डिसेंबर रोजी होणारं आयपीएल ऑक्शन टीव्हीवर स्टार स्पोर्ट्सवर पाहता येईल. तर मोबाईल यूजर्सना जिओस्टारच्या अॅप आणि वेबसाईटवर सामना पाहता येईल.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा