आज दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या संघांमध्ये विशाखापट्टणम येथे चुरस लढताना पाहायला मिळणार आहे. गेल्या हंगामानंतर दोन्ही संघात मोठे फेरबदल झालेले पाहायला मिळणार आहे. यावेळी आयपीएलमध्ये दिल्लीकडून खेळणारा रिषभ पंत लखनऊकडून खेळणार आहे तर लखनऊकडून खेळणारा केएल राहुल दिल्लीकडून खेळणार आहे.
मात्र दिल्ली संघाच्या कर्णधारपदाची धुरा अक्षर पटेल हाती देण्यात आली आहे. त्यामुळे यावेळी दोन्ही संघांच्या नवनेतृत्वाचा कस लागणार आहे. असं असताना आता लखनऊ सुपर जायंट्स या संघासाठी दुष्काळात तेरावा महिना आला आहे. लखनऊ सुपर जांयट्स संघाला मोठा धक्का बसला आहे.
लखनऊ सुपर जायंट्स संघाचा स्टार गोलंदाज मयांक यादव दुखापतग्रस्त झाला आहे. मयांक यादव गेल्या काही महिन्यांपासून मैदानापासून दूर आहे. मयांकच्या बोटाला इन्फेक्शनमुळे दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याला रिहॅबसाठी 1 ते 2 आठवड्यांचा अवधी लागणार आहे. त्यामुळे त्याचं आयपीएल २०२५ स्पर्धेतील कमबॅक आणखी लांबणीवर गेलं आहे.