क्रिकेटविश्वात अनेक गोष्टी घटताना दिसत आहेत. भारतीय संघत नुकताचं ऑस्ट्रेलिया सिडनीमध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2024 ची मालिका खेळून झाले ज्यामध्ये भारतीय संघाचा पराभव झाला असून आता इंग्लंडचा संघ भारतात येणार आहे. यावेळी 5 टी20 आणि 3 वनडे अशी सामन्यांची मालिका दोन्ही संघामध्ये रंगणार आहे त्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे.
अशात भारतीय क्रिकेटर्सच्या आयुष्यात अनेक गोष्टी घटताना पाहायला मिळत आहे ज्यामध्ये अनेक खेळाडूंच्या संसारात घटस्फोटाचं वादळ आलं आहे. ज्यामध्ये शिखर, दिनेश कार्तिक, शामी, हार्दिक अन् नंतर चहलचा नंबर लागला. चहल आणि धनश्रीच्या वेगळं होण्याच्या बातम्या सुरुचं होत्या की आता आणखी एका भारतीय क्रिकेटरच्या संसारात घटस्फोट हा अडथळा आला आहे.
चहलनंतर मनीष पांडेच्या वैवाहिक आयुष्यातही ताणतणावाचे वादळ
चहलनंतर आता भारतीय संघाबाहेर असलेला अनुभवी फलंदाज मनीष पांडे आणि त्याची पत्नी अभिनेत्री आश्रिता शेट्टी यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. मनीष पांडेने पत्नी आश्रिता शेट्टीचे त्याच्या इन्स्टाग्रामवरून डिलिट केले आहेत. आश्रिता शेट्टीनेही तिच्या प्रोफाईलवरून मनीष पांडेचा फोटो काढून टाकले आहेत. एवढचं नाही तर दोघेही आता सोशल मीडियावर एकमेकांना फॉलो करत नाहीत. आश्रिता आयपीएल दरम्यान अनेकदा स्टेडियममध्ये मनीषला पाठिंबा देण्यासाठी दिसली आहे. मात्र आयपीएल 2024 मध्ये ती मनीषला पाठिंबा देण्यासाठी दिसली नाही.
मनीष पांडेची क्रिकेटमधील आतापर्यंतची कारकिर्द
मनीष पांडे आणि अश्रिता शेट्टी हे दोघेही 2019मध्ये लग्नबंधनात अडकले. आश्रिता ही मुळची कर्नाटकातील असून ती तमिळ चित्रपटांमध्ये अभिनेत्री म्हणून काम करते. 2015 मध्ये भारतासाठी पदार्पण केले मात्र 2021 नंतर त्याला भारतीय संघाकडून खेळण्याची संधीही मिळालेली नाही. 2009 मध्ये आरसीबीकडून खेळताना त्याने शतक केले होते. आयपीएलमध्ये शतक झळकावणारा मनीष पांडे हा पहिला भारतीय फलंदाज आहे. भारतासाठी त्याने 29 एकदिवसीय सामन्यांमध्ये 566 धावा केल्या. तसेच 39 टी-20 मध्ये 709 धावा केल्या आहेत.