आयपीएल 2025 मधील 50 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सवर दणदणीत विजय मिळवला आहे. मुंबईने राजस्थानला विजयासाठी 218 धावांचं आव्हान दिलं होतं. राजस्थानचा संघ 117 धावांवर ऑलआऊट झाला आणि मुंबईने 100 धावांनी सामना जिंकला.
रोहित शर्माने 53 आणि रायन रिकेल्टनने 61 धावा केल्या. या जोडीने 116 धावांची भागीदारी केली. यासोबतच हार्दिक पंड्या आणि सूर्यकुमार यादव या दोघांनी 94 धावांची नाबाद भागीदारी केली.
या विजयासह, हा संघ आयपीएल 2025 च्या पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. राजस्थान रॉयल्सचा संघ यंदाच्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारा दुसरा संघ ठरला आहे.