नुकत्याच पार पडलेल्या बॉर्डर-गावस्कर मालिकेत वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने दोन कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले. वैयक्तिक कारणांमुळे रोहित शर्माला मालिकेतील सलामीच्या सामन्यात अनुपस्थित रहाव लागलं आणि काही कारणाने त्याला शेवटच्या कसोटीलाही वगळण्यात आल्यामुळे त्याला शेवटच्या सामन्याला मुकवं लागलं.
त्यामुळे बुमराहने पर्थमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले आणि संघाला विजय मिळवून दिला, परंतु सिडनीमध्ये भारताचा पराभव झाला. यानंतर आता भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सज्ज असल्याचं पाहायला मिळत आहे. यादरम्यान उपकर्णधार पदाचा धुरा बुमराहकडे सोपण्याच्या चर्चा सुरु होत आहेत. याचपार्श्वभूमीवर आता मोहम्मद कैफने त्याच्या कॅप्टन्सीवर ट्वीट केले आहे.
भारतीय संघ सोनेरी हंस गमवेल- मोहम्मद कैफ
"पूर्णवेळ कर्णधार म्हणून बुमराहची नियुक्ती करण्यापूर्वी बीसीसीआयने दोनदा विचार करावा. या सामन्यामध्ये त्याने केवळ विकेट्स घेणे आणि तंदुरुस्त राहणे यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. त्याच्यावर संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवल्यास, क्षणाच्या उष्णतेत वाहून गेल्याने दुखापती होऊ शकतात आणि उत्कृष्ट कारकीर्द कमी होऊ शकते. यामुळे भारतीय संघाला सोनेरी हंस गमवावा लागेल.
जसप्रीत बुमराहची उत्कृष्ट खेळी
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमधील 5 कसोटी सामन्यांमध्ये, बुमराहने 9 सामन्यांमध्ये 32 विकेट्स घेत आघाडीकडून गोलंदाजी केली. तो सर्वात यशस्वी गोलंदाज होता आणि त्याला प्लेअर ऑफ द सिरीज म्हणूनही गौरविण्यात आले. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमधील 5 कसोटी सामन्यांमध्ये, बुमराहने 9 सामन्यांमध्ये 32 विकेट्स घेत आघाडीकडून गोलंदाजी केली. तो सर्वात यशस्वी गोलंदाज होता आणि त्याला प्लेअर ऑफ द सिरीज म्हणूनही गौरविण्यात आले.