लंडनमधील केनिंग्टन ओव्हल येथे इंग्लंड दौऱ्याच्या शेवटच्या आणि अंतिम कसोटीला म्हणजेच पाचव्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाचव्या कसोटी सामन्यात भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने एक मोठी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. सिराजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 200 विकेट्सचा टप्पा गाठत महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला आहे.
त्याच्या या विक्रमी कामगिरीमुळे त्याने सचिन तेंडुलकरच्या 201 विकेट्सच्या एकूण कामगिरीला मागे टाकलं आहे. विशेष म्हणजे सचिन तेंडुलकर हा मूळचा फलंदाज असून त्याने आपल्या कारकिर्दीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 203 विकेट्स घेतल्या आहेत, ज्यामध्ये कसोटीत 118, एकदिवसीय सामन्यांमध्ये 71 आणि टी-20 सामन्यांमध्ये 14 विकेट्सचा समावेश आहे. सचिन तेंडुलकरने आपल्या संपूर्ण आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकूण 201 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामध्ये कसोटीत 46, एकदिवसीय सामन्यांमध्ये 154 आणि टी-20 मध्ये 1 विकेट आहे.
इंग्लंडविरुद्ध कसोटीत ठसठशीत कामगिरी
ओव्हल येथे सुरू असलेल्या पाचव्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या पहिल्या डावात सिराजने 16.2 षटकांत 86 धावा देत 4 महत्वाच्या विकेट्स घेतल्या. त्याने ओली पोप, जो रूट, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक यांना तंबूत परत पाठवलं. या मालिकेत इंग्लंडने आधीच 2-1 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे भारताला ही कसोटी जिंकणे अत्यंत आवश्यक ठरणार आहे, जेणेकरून मालिका बरोबरीत आणता येईल. भारतीय गोलंदाजांनी सामन्यावर पकड मिळवली असून सिराजने पुन्हा एकदा सामन्याचे चित्र बदलण्याचे काम केले आहे.