क्रिकेट

IPL 2025 Mohammed Shami : "...नाही तर तुला मारुन टाकू" सामना खेळताना शमीला आला जीवे मारण्याचा मेल

IPL 2025 सामना खेळताना मोहम्मद शमीला जीवे मारण्याचा ईमेल, पोलिसांकडे तक्रार दाखल.

Published by : Prachi Nate

सध्या आयपीएलचे (Indian Premier League) वारे वाहत आहेत. असं असताना अनेक खेळाडू हे कोणत्या न कोणत्या गोष्टीतून चर्चेतून येत असतात. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी अनेक वेळा चर्चेत आला आहे. मोहम्मद शमी हा आयपीएलमध्ये (IPL 2025) सनरायझर्स हैदराबाद (SRH) या संघाकडून खेळत आहे. यावेळी सामना खेळत असताना त्याला धमकीचा ईमेल आला आहे.

रविवारी 4 मे ला राजपूत सिंधर नाववरुन धमकीचे ईमेल आले आहेत, यावेळी 1 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली. त्याचसोबत मोहम्मद शमीला (Mohammed Shami) जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकी मिळताच मोहम्मद शमीने उत्तर प्रदेशमधील अमरोहा पोलसांकडे धाव घेतली आहे. यानंतर याबाबत आता चौकशी सुरु आहे.

याआधी ज्यावेळी शामी भारतीय संघाकडून चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी खेळत होता. त्यावेळी देखील शामीवर ऑल इंडिया मुस्लिम जमातचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रझवी यांनी जोरदार टीका केली होती. त्याने रोजाच्या उपवासादरम्यान एनर्जी ड्रिंक प्यायल होत. मौलवीच्या मते, रोजा न ठेवल्याने मोहम्मद शमीने मोठा गुन्हा केल्याचं सांगितलं होतं.

एवढचं नाही तर शामीच्या मुलीवर देखील होळी खेळून सण साजरी केल्यामुळे टीका करण्यात आलं होत. त्यावेळी मोहम्मद शमीच्या पाठिशी संपूर्ण देश उभा राहीला होता. पण शमीने मात्र काहीही प्रतिक्रिया न देता शांतपणे प्रकरण हाताळले होते. मात्र आता या धमकीच्या प्रकरणावर शामी काय प्रतिक्रिया देणार हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा