सध्या रमजानचा महिना सुरु आहे. या महिन्यामध्ये मुस्लिम बांधव रोजा ठेवतात. यावरूनच आता उत्तर प्रदेशमधील बरेलीमधील मौलाना भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज मोहम्मद शमीवर भडकले आहेत . रोजा न ठेवल्याने त्यांनी या घटनेचा विरोध केला आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यादरम्यान ज्यूस पिताना दिसला. त्यामुळे त्याने रोजा ठेवला नाही आणि त्याने जे केलं तो एक गुन्हा आहे. तो शरीयतच्या दृष्टीने गुन्हेगार असल्याचे मौलाना म्हणाले आहेत. ऑल इंडिया मुस्लिम जमातचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रझवी यांनी एक निवेदन जारी केले आहे. या जारी केलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, "इस्लामने रोजा करणे कर्तव्य म्हणून घोषित केले आहे. जर एखाद्या व्यक्तीने जाणूनबुजून रोजा केला नाही तर तो मोठा पापी आहे. रोजा हे कर्तव्य असूनही मोहम्मद शमीने उपवास केला नाही. शमीने उपवास न ठेवता मोठा गुन्हा केला आहे, तो शरियतच्या दृष्टीने गुन्हेगार आहे".
पुढे ते म्हणाले की, "क्रिकेट करा, खेळ करा, सर्व कामे करा, परंतु अल्लाहने व्यक्तीवर दिलेल्या जबाबदाऱ्याही पार पाडा. शमीने हे सर्व समजून घेतले पाहिजे. शमीने आपल्या पापांची अल्लाहकडे माफी मागितली पाहिजे". असे ते म्हणाले.