भारताचा स्टार क्रिकेटर हार्दिक पांड्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर चांगलाच चर्चेत आलेला दिसत आहे. मात्र त्याच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा तो खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत राहिलेला दिसून आला. पत्नी नताशापासून विभक्त होऊनदेखील त्याने या सगळ्याचा करियरवर काहीच परिणाम होऊ दिला नाही. गेल्या वर्षीच्या आयपीएलमध्ये रोहित शर्माऐवजी मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी हार्दिकची निवड करण्यात आली. त्यामुळे अनेकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते.
मात्र त्याने टी-20 विश्वकप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी भारताकडे येण्यामध्ये हार्दिक पांड्याचा महत्त्वाचा वाटा होता. त्याचप्रमाणे आता आयपीएलच्या येत्या हंगामात चांगला खेळ खेळून सर्वांची शाबासकी मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे हार्दिक म्हणाला आहे. दरम्यान येत्या 22 मार्च पासून आयपीएलचे नवीन हंगाम सुरु होत आहे. त्याआधी त्याने सांगितले की, "मी कधीही हार मानत नाही. माझ्या करियरमध्ये असेही काही दिवस आले जेव्हा माझं लक्ष जिंकण्याऐवजी खेळाकडे होते. मला समजलं की माझ्याबरोबर काहीही झालं तरीही क्रिकेट नेहमीच माझ्यासोबत असणार आहे".