क्रिकेट

KKR vs PBKS IPL 2025 : केकेआर-पंजाबचा सामन्यात पावसाची हजेरी, मात्र यामुळे मुंबईच्या प्लेऑफ आशा धोक्यात

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स विरु्द्ध सामन्यात पावसामुळे सामना रद्द झाल्यामुळे मुंबई इंडियन्सच्या प्लेऑफ आशा धोक्यात

Published by : Prachi Nate

कोलकाताच्या ईडन गार्डन्स येथे कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स हा सामना खेळवला जात होता. यादरम्यान पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र सामन्याचा पहिला डाव पूर्ण होताच दुसऱ्या डावाच्या पहिल्या ओव्हर नंतर पावसाचा वर्षाव झाला. ज्यामुळे हा सामना रद्द करण्यात आला. पंजाबने कोलकतासमोर 201 धावांचे आव्हान ठेवले होते.

सामना रद्द झाल्यामुळे कोलकाता आणि पंजाब या दोन्ही संघांना 1-1 गुण देण्यात आले. या गुणांमुळे पंजाब चौथ्या स्थानावर गेला तर याचा फटका हा मुंबई इंडियन्स संघाला बसला आहे. कारण हा सामना होण्यापुर्वी मुंबई आरसीबीच्या विजयामुळे तिसऱ्या स्थानावरुन चौथ्या स्थानावर गेली होती. तर आता पंजाबला सामना रद्द झाल्यामुळे मिळालेल्या 1 गुणामुळे मुंबई पाचव्या क्रमांकावर गेली आहे. तर मुंबईचा पुढचा सामना लखनौ सुपर जायंट्ससोबत आहे. मुंबई इंडियन्सला स्पर्धेत कायम राहण्यासाठी हा सामना जिंकणं महत्त्वाचं असणार आहे.

पंजाबकडून सुरुवातीला प्रभसिमरन सिंगने आणि प्रियांश आर्य यांनी पंजाबची जोरदार सुरुवात करुन दिली. प्रियांश आर्याने प्रभसिमरन सिंगच्या भागिदारीने 35 बॉलवर 69 धावा केल्या त्यानंतर तो आऊट झाला. मात्र प्रभसिमरन सिंग 49 बॉलमध्ये 83 धावा करत टिकून राहिला. तीन ओव्हर्सनंतर तो कॅचआउट झाला. त्यावेळी त्याच्यासोबत कर्णधार श्रेयस अय्यर होता. श्रेयस अय्यरने 25 धावा करत माघार घेतला.

त्यानंतर जॉस इंग्लिसने 11 धावा केल्या तर ग्लेन मॅक्सवेल पुन्हा एकदा अपयशी ठरला. दुसरीकडे कोलकाताकडून सुरुवातीला रहमानुल्लाह गुरबाज आणि सुनील नारायण सलामीसाठी आले. मात्र पावसाने हजेरी लावल्यामुळे कोलकाताला फलंदाजीची संधी मिळाली नाही. त्यामुळे त्यांची गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. वैभव अरोराने पंजाबचे 2 गडी बाद केले. तर आंद्रे रसेल आणि वरुण चक्रवर्ती यांनी पंजाबचे प्रत्येकी 1-1 गडी बाद केले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा