भारतीय क्रिकेटची पंढरी असलेला वानखेडे स्टेडियम आता सज्ज आहे. भारतीय क्रिकेटर्ससह क्रिकेटप्रेमींच देखील सगळ्यात आवडत स्टेडियम म्हणजेचं मुंबईमधील वानखेडे स्टेडियम, आणि या स्टेडियमला आज ५० वर्ष पूर्ण झाली आहेत. रविवारी म्हणजेच आज वानखेडे स्टेडियमच्या ५० वर्ष पूर्ण होण्यानिमित्ताने एक भव्यदिव्य सोहळ्याच आयोजन करून तो सोहळा स्टेडियममध्ये पार पाडण्यात येणार आहे. यावेळी सोहळ्याला मुंबईचे दिग्गज खेळाडू ज्यांनी भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व केले आशा सर्व कर्णधारांचा सत्कार सोहळा पार पाडण्यात येणार आहे.
ज्यामध्ये सुनील गावस्कर, दिलीप वेंसरकर, रवी शास्त्री, भारतरत्न सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, अंजिक्य राहणे, सुर्यकुमार यादव या सर्वांचा सन्मान या वेळी करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे भारताचे दिग्गज खेळाडू पद्मभूषण सुनील गावस्कर यांचा ७५ वा वाढदिवस देखील या वेळी साजरा केला जाणार आहे. याचसोबत महाराष्ट्राचे लाडके संगीतकार अजय-अतुल आणि रोकस्टार अवधूत गुप्ते यांचा कॅान्सर्ट ही या वेळी पार पडणार आहे. एक कमाल लाईट आणि साऊंड शो पण यावेळी पाहायला मिळणार आहे.