दुबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन संघांमध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या पहिल्या उंपात्य फेरीचा सामना 4 मार्च रोजी पार पडला. भारताने 4 गडी राखून ऑस्ट्रेलियावर मात केली आहे. टीम इंडियाने साखळी फेरीतील तिनही सामने जिंकले आहेत. तर ऑस्ट्रेलियाने 1 सामना जिंकला. तर 2 सामने पावसामुळे रद्द झाल्याने 1-1 असे एकूण 2 गुण मिळाले आणि कांगारु उपांत्य फेरीत पोहचले. आता भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम फेरीत पोहचण्यासाठी चांगली चुरस पाहायला मिळाली. मात्र भारताने हा सामना जिंकत विजय खेचत आणला आहे.
तसेच आज 5 मार्च रोजी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या दुसऱ्या उंपात्य फेरीचा सामना दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड या संघांमध्ये लढताना पाहायला मिळाला आहे. लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. ज्यामध्ये न्यूझीलंड संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला. या सामन्यात केन विल्यमसन आणि रचिन रवींद्रच्या जोडीने धुमाकूळ घालत 150 अधिक धावांची भागीदारी रचली आहे. दरम्यान २७ धावा करत विल्यमसनने एक मोठा दुर्मिळ विक्रम आपल्या नावे केला आहे. याचसोबत न्यूझीलंड संघ मोठी धावसंख्या रचणार असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
या सामन्या दरम्यान रचिन रवींद्रने 101 बॉलमध्ये 13 चौकार आणि एक षटकार मारत 108 धावा केल्या आणि संघाला मोठ्या धावसंख्येचा पाया रचून देण्यास मदत केली. त्यानंतर केन विल्यमसनने ही 94 बॉलमध्ये 10 चौकार आणि 2 षटकार मारत 102 धावा मारल्या आणि त्याचे 15 वे वनडे शतक झळकावले आहे. तर या सामन्यात न्यूझीलंड संघाने बाजी मारेली असून तो संघ अंतिम फेरीच्या सामन्यासाठी भारतीय संघासमोर उभा राहणार आहे. हा अंतिम सामना रविवारी 9 मार्च रोजी खेळला जाणार आहे. तसेच आता भारता विरुद्ध न्यूझीलंड संघ चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चा अंतिम सामना खेळणार आहे.