आशिया कप 2025 मध्ये टीम इंडियाने विजय मिळवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टीम इंडियाला अभिनंदन करण्यासाठी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. ज्यात त्यांनी म्हटलं होत की, "ऑपरेशन सिंदूर असो किंवा खेळाचे मैदान निकाल एकच,भारताचा विजय." त्यांच्या या संदेशाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. यावर आता पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ संतापले असून त्यांनी यावर असं काही म्हटलं, ज्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
ख्वाजा आसिफ यांनी पंतप्रधान मोदींच्या पोस्टला प्रत्युत्तर देत म्हटलं आहे की, "क्रिकेटची संस्कृती आणि भावना नष्ट करून, मोदी स्वतःचे राजकारण वाचवण्यासाठी उपखंडातील शांतता आणि समस्यांचे निराकरण करण्याची शक्यता नष्ट करत आहेत. अशा प्रकारे शांतता आणि आदर पुनर्संचयित केला जाऊ शकत नाही. पाकिस्तान-भारत युद्धाचा निकाल 6/0 होता. आम्ही काहीही बोलत नाही आहोत; मोदींना भारतात आणि जगात अपमानित केले गेले आहे."
टीम इंडियाची सुरुवात काहीशी चांगली पाहायला मिळाली नाही. संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांनी अर्धशतकीय भागीदारी करत भारताची परडी सावरली. यावेळी संजू सॅमसन 24 धावा करत माघारी फिरला. त्यानंतर शिवम दुबे आणि तिलक वर्मा यांच्या भागीदारीने पुन्हा भारताचा डाव सावरला. अंतिम ओव्हरमध्ये 10 धावा हव्या असताना रिंकू सिंगने अखेरच्या चेंडूवर विजयी चौकार लगावत सामन्यावर भारताचे नाव कोरले. दरम्यान भारत आणि पाकिस्तान अंतिम सामन्यात तिलक वर्माने सामना जिंकवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. तिलक वर्माने 53 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकार मारत 69 नाबाद धावा केल्या.