क्रिकेट

Haider Ali : यश दयालनंतर आणखी एका क्रिकेटपटू मोठ्या अडचणीत! अत्याचाराच्या आरोपाखील थेट पोलिसांच्या ताब्यात

पाकिस्तानचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू हैदर अली यांच्यावर इंग्लंडमध्ये एका महिलेने बलात्काराचा गंभीर आरोप केला असून, या प्रकरणामुळे क्रिकेटविश्वात खळबळ माजली आहे.

Published by : Team Lokshahi

पाकिस्तानचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू हैदर अली यांच्यावर इंग्लंडमध्ये एका महिलेने बलात्काराचा गंभीर आरोप केला असून, या प्रकरणामुळे क्रिकेटविश्वात खळबळ माजली आहे. हा प्रकार इंग्लंड दौर्‍यादरम्यान घडला असून, ते पाकिस्तान ‘ए’ संघासोबत सध्या इंग्लंडमध्ये आहेत. ग्रेटर मँचेस्टर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणातील सर्वात मोठा प्रश्न म्हणजे आरोप करणाऱ्या महिलेची ओळख. ती पाकिस्तानातील आहे का? इंग्लंडमध्ये राहणारी आहे की इतर कोणत्या देशातील? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तिच्या वयाबाबतही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. जर ती 16 वर्षांखालील असेल, तर हैदर अलींसाठी कायदेशीर संकट अधिक गंभीर ठरू शकते, मात्र प्राथमिक अंदाजानुसार तिचे वय 16 पेक्षा कमी असण्याची शक्यता कमी आहे.

दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हैदर अली आणि संबंधित महिला पूर्वीपासून एकमेकांना ओळखत होते का. ती त्यांची मैत्रीण होती का, संघातील स्टाफमधील कोणी होती का किंवा दोघांची पहिलीच भेट इंग्लंडमध्ये झाली का, हे तपासले जात आहे. अनेकदा अशा प्रकरणांमध्ये पीडित महिला आरोपीला आधीपासून ओळखत असते, त्यामुळे त्यांच्या नातेसंबंधांचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे.

महिलेनं पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत केवळ बलात्काराचा आरोप नाही, तर अन्य गंभीर बाबींचाही उल्लेख असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेषतः, हैदर अली यांनी तिच्यावर शारीरिक मारहाण केली का किंवा तिला नशा देऊन हा प्रकार घडवून आणला का, हे पोलिस तपासत आहेत. जर हे सिद्ध झाले, तर गुन्ह्याची तीव्रता वाढणार असून शिक्षा देखील अधिक कठोर होण्याची शक्यता आहे.

कायद्यानुसार, lawtonslaw वेबसाइटच्या माहितीनुसार, इंग्लंडमध्ये बलात्काराच्या दोषीला 4 वर्षांपासून ते 19 वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते. दोषी ठरल्यास हैदर अलींना किमान 4 वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो, मात्र ही किमान शिक्षा आहे आणि ती फारच कमी प्रकरणांमध्ये दिली जाते. वास्तविक शिक्षा प्रकरणातील पुरावे, घटनेचे स्वरूप आणि पीडितेकडे असलेल्या साक्षांवर अवलंबून असेल.

सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून, महिलेची ओळख, तिचे नागरिकत्व, घटनेचा अचूक तपशील आणि दोघांमधील नातेसंबंध याबाबत पोलिसांकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. तपासाचा निकाल लागेपर्यंत संपूर्ण प्रकरण गुप्त ठेवण्यात आले आहे. या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्षेत्रात धक्का बसला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा