आशिया कप स्पर्धेतील पाकिस्तान आणि युएई यांच्यातील सामना दुबई स्टेडिअमवर खेळवला जाणार आहे. दरम्यान हा सामना सुरु होण्यापु्र्वीच मोठ्या चर्चेत येताना पाहायला मिळाला. पाकिस्तानने मॅच रेफरी पॅनेलमधून मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांना काढून टाकण्याची मागणी आसीसीने फेटाळल्यानंतर पाकिस्तानने युएईसोबतच्या सामन्याला नकार दिला. त्यानंतर आता एक मोठी बातमी समोर येत आहे.
पीसीबीने नंतर सांगितले की ते आयसीसीसोबत हा प्रश्न सोडवण्यासाठी काम करत आहेत आणि म्हणूनच बहिष्कार टाकण्याऐवजी सामना सुरू होण्यास एक तास उशीर करण्याची मागणी केली आहे. दरम्यान पाकिस्तानी संघ बराच वेळ त्यांच्या हॉटेलमध्ये राहिला आणि शेवटी संध्याकाळी 7 नंतरच दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमकडे रवाना झाला. आयसीसीने पाकिस्तानची मागणी फेटाळल्यानंतर पीसीबीने आपल्या संघाला त्यांच्या हॉटेलमध्ये परतण्याचे आदेश दिले.
ज्यामुळे पाकिस्तानी संघ दुबई स्टेडियमसाठी रवानाही झाला नाही. याचपार्श्वभूमिवर आशियाई क्रिकेट परिषदेने एका पाऊल उचलत पाकिस्तान आणि युएई यांच्यातील सामन्याची ट्वीटर पोस्ट डिलिट केली आहे. त्यामुळे वातावरण गंभीर झालं. मात्र आता पाकिस्तान आसीसीला शरण गेला असून हा सामना एक तास उशिरा सुरु करावा अशी मागणी केली आहे.