INA vs Pak  
क्रिकेट

INA vs Pak : भारत-पाकिस्तान सामन्यात पाकिस्तानची नाणेफेकीत बाजी; पहिल्या गोलंदाजीचा निर्णय

कोलंबोतील R. Premadasa Cricket Stadium आर. प्रेमदासा क्रिकेट स्टेडियम येथे आज हा बहुचर्चित सामना रंगत आहे.

Published by : Riddhi Vanne

भारत-पाकिस्तान सामना म्हटला की उत्साह ओसंडून वाहतो. कोलंबोतील R. Premadasa Cricket Stadium आर. प्रेमदासा क्रिकेट स्टेडियम येथे आज हा बहुचर्चित सामना रंगत आहे. Suryakumar Yadav सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ मैदानात उतरला आहे, तर पाकिस्तानची धुरा Salman Ali Agha सलमान अली आगा सांभाळत आहेत.

नाणेफेक जिंकून पाकिस्तानने प्रथम गोलंदाजीचा पर्याय निवडला. भारताकडून संघरचनेत काही बदल करण्यात आले आहेत. Abhishek Sharma अभिषेक शर्मा फिट झाल्याने पुनरागमन झाले, तर Sanju Samson संजू सॅमसन आजारामुळे बाहेर आहे. श्रीलंकेतील खेळपट्टी लक्षात घेऊन वेगवान गोलंदाजाऐवजी फिरकीला प्राधान्य देत Kuldeep Yadav कुलदीप यादवला संधी देण्यात आली आहे.

दरम्यान, पाकिस्तानचा गोलंदाज Usman Tariq उस्मान तारिक याच्या गोलंदाजी पद्धतीवर चर्चा रंगली होती. त्यामुळे त्याची कामगिरी आणि भारतीय फलंदाज त्याला कसे सामोरे जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रोमांच, रणनीती आणि तगडी स्पर्धा—भारत-पाकिस्तान लढत पुन्हा एकदा चाहत्यांसाठी पर्वणी ठरत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा