क्रिकेट

Shreyas Iyer Angry On Shashank Singh : बापरे किती तो राग! श्रेयस हस्तांदोलनादरम्यान तापला, शशांकने असं केल तरी काय?

मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स या क्वालिफायर 2 च्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर हस्तांदोलन करते वेळी पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यर त्याच्याच टीम मेंबर शशांक सिंगवर चिडलेला दिसला.

Published by : Prachi Nate

मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स या क्वालिफायर 2 च्या सामन्यात श्रेयसने मोर्चा सांभाळला. त्याने 87 धावांसह 19 ओव्हरमध्ये 5 बाद आणि 207 धावांनी संघाला फायनलमध्ये पोहचवलं आहे. यावेळी श्रेयस अय्यरने शांतपणे हातातून गेलेली मॅच वर काढली. या सामन्यानंतर हस्तांदोलन करते वेळी पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यर त्याच्याच टीम मेंबर शशांक सिंगवर चिडलेला दिसला. कारण यात चूक देखील शशांकचीच होती.

ज्यावेळेस 17 वी ओव्हर सुरु होती त्यावेळेस शशांक सिंगने मिड-ऑनकडे शॉट मारला आणि एक धाव घेतली. यावेळेस हार्दिक पांड्याने सरळ थ्रो टाकत शशांक स्टंप जवळ पोहचण्याआधीच स्टंप उडवून दिला. ज्यामुळे शशांक आऊट झाला. मात्र यावेळी रिप्लेमध्ये स्पष्टपणे दिसत होते की, तो धावत नव्हता तर तो सहज चालत होता, त्याने मुंबई इंडियन्ससोबतच्या क्वालिफायर 2 आणि इतक्या महत्त्वाच्या सामन्यादरम्यान हा निष्काळजीपणा केला.

महत्त्वाच म्हणजे ज्यावेळेस शशांकने हा आळसपणा केला त्यावेळेस पंजाबला विजयासाठी 36 धावांची गरज होती. ज्यामुळे संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर त्याच्यावर संतापला. सामना झाल्यानंतर हस्तांदोलन करताना श्रेयस समोर जेव्हा शशांक आला त्यावेळेस तो त्याला शिवी देत "माझ्या तोंडाला लागू नकोस, माझ्या नादाला लागू नकोस" असं म्हणाल्याचं त्याच्या ओठांच्या हालचालींवरून दिसत होत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल व्हायरल होत आहे.

दरम्यान मुंबई इंडियन्स विरुद्ध फलंदाजी करत असताना पंजाबचा कर्णधार श्रेयसने 41 बॉलमध्ये 5 चौकार तर 8 षटकार मारत 87 धावांची जबरदस्त बॅटिंग केली. तर त्याच्यासोबत जॉश इंग्लिसने 38, नेहल वढेरा 48 धावांची साथ देत सामना जिंकला.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा