IPL 2025 Cancel India Pakistan War 
क्रिकेट

IPL 2025 Cancel India Pakistan War : IPL सामन्यादरम्यान ब्लॅक आऊट! उडाला गोंधळ, चिअरलीडरने सांगितला तो भयंकर प्रसंग

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धाच्या तणावामुळे आयपीएलमधील पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामना रद्द, चिअरलीडरने सांगितला भयानक प्रसंग.

Published by : Prachi Nate

पहलगाम मधील हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर म्हणून 'ऑपरेशन सिंदूर' सुरु केलं. यानंतर काही वेळातचं भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली. ज्यामुळे दोन्ही देशात तणावपुर्ण वातावरण निर्माण झाली आहे. अशातचं भारत-पाकिस्तान तणावामुळे IPLवर या युद्धाचा परिणाम झाला आहे. यादरम्यान IPL 2025 चा 58 वा सामना जो पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स या संघांमध्ये धर्मशाळा येथे खेळला जाणार होता. धर्मशाळेच्या शेजारील जम्मू-काश्मीर आणि पंजाबमधील शहरांमध्ये हवाई हल्ल्याचा इशारा देण्यात आल्यानंतर हा सुरु असलेला सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. यादरम्यान स्टेडिअम रिकामे करण्यासाठी सुरुवातीला फ्लड लाईट्समधील बिघाड असल्याचे कारण सांगण्यात आले. (IPL 2025 Cancel India Pakistan War)

चिअरलीडरने पाहिलेला प्रसंग

ही चिअरलीडर म्हणाली की, "सामना सुरु असताना अचानक संपूर्ण स्टेडिअम खाली करण्यात आलं होत. पंजाबचा संघ प्रथम फलंदाजी करत असताना स्टेडियमचा एक दिवा बंद करण्यात आला. त्यानंतर बाकीचे इतर दिवेही बंद करण्यात आले. त्यानंतर खेळाडूंसह स्टेडिअममध्ये उपस्थित असणाऱ्या सगळ्यांना ताबडतोब मैदानाबाहेर पाठवण्यात आले. ज्यावेळी स्टेडिअम रिकामी केलं जात होत, त्यावेळी स्टेडिअम उपस्थित असणारे सगळे लोक बॉम्ब येत असल्याचं मोठ्या मोठ्याने ओरडत होते. मैदानात भीतीदायक वातावरण दिसू लागल्याने काही वेळाने हा सामना रद्द करण्यात आला. हे दृष्य फार भयानक होत. आम्हाला धर्मशाळेतून लवकरात लवकर बाहेर पडायचे आहे आणि मला विश्वास आहे की, आयपीएलचे लोक आमची काळजी घेतील", या चिअरलीडरचा व्हिडिओ आता चाहत्यांमध्ये व्हायरल होत आहे.

या सामन्यात पंजाबचा संघ प्रथम फलंदाजी करत होता आणि पंजाबने 10.1 षटकांत एका विकेटच्या मोबदल्यात 122 धावा केल्या होत्या. यानंतर अचानक भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी तणाव वाढत असल्यामुळे आणि तेथील परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या संघाला आणि चाहत्यांना कडक सुरक्षेत बाहेर काढण्यात आले. यासाठी बीसीसीआय खेळाडूंना बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेनची व्यवस्था करत आहे. खेळाडूंसाठी उना येथून एक विशेष ट्रेन धावेल जिथून खेळाडूंना दिल्लीला आणता येईल.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा