कालची PBKS vs KKR या संघांमध्ये रंगलेला सामना खरचं रोमांचक होता. क्रिकेटमध्ये नुसता थरार नाही तर यात कधी काय होईल हे सांगता येत नाही, असं म्हणतात ते खरचं आहे. कारण ते काल पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्यस यांच्यामध्ये झालेल्या सामन्यादरम्यान पाहायला मिळालं आहे. काल कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स या संघांचा सामना महाराजा यादविंद्र सिंग इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर रंगला.
या सामन्यादरम्यान पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर दुसरीकडे कोलकाताला गोलंदाजी करण्याची संधी मिळाली. मात्र, घरच्या मैदानात सामना असून देखील पंजाबचा कोलकाताच्या गोलंदाजांसमोर ठावठिकाणा राहिला नाही. पंजाबचा संघ अवघ्या 15.3 ओव्हर्समध्ये ऑल आऊट झाला असून त्यांनी फक्त 111 धावा करत केवळ 112 धावांच आव्हान कोलकाताला दिलं आहे.
मात्र, म्हणतात ना नशीब आणि वेळ कधी कोणाच्या बाजूने साथ देईल सांगता येत नाही. पंजाबने कोलकताच्या तोंडातला घास हिसकावून घेतला. हे सर्व शक्य झालं ते गोलंदाजी आणि फिल्डिंगमुळे. कालच्या सामन्यात पंजाबच्या गोलंदाजांनी अशी काही फिरकी केली की, कोलकाता अवघ्या 96 धावांत गारद झाला. पंजाबने सर्वात कमी धावसंख्या करूनही कोलकाताच्या सलामवीरांना गार केलं.
यादरम्यान पंजाब किंग्स संघाची मालकीण अभिनेत्री प्रीती झिंटाने आनंदाच्या भरात युजवेंद्र चहलला थेट मिठीच मारली आहे. एवढचं नव्हे तर तिने चहलसाठी कौतुकाची एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. ज्यात तिने चहलला 'हिरो' म्हणून त्याचे भरभरून कौतुक केलं आहे. तसेच सामना संपताच ती मैदानात उतरली आणि तिने चहलला मिठी मारली आणि गप्पा मारल्या. त्या दोघांचा हा क्षण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. PBKS vs KKR या सामन्यादरम्यान चहलची जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली. त्याने त्याच्या भेदक गोलंदाजीसह कोलकताच्या चार महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या. त्यामुळे कोलकाता 96 धावांसह पराभूत झाला.