आज महाराजा यादविंद्र सिंग इंटरनॅशनल मैदानावर पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा सामना रंगला. या सामन्या दरम्यान आरसीबीने नाणेफेक जिंकत सामन्यावर देखील विजय मिळवला. नाणेफेक जिंकून आरसीबीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी पंजाबने 158 धावांच लक्ष आरसीबीला दिले होते. ते आव्हान पुर्ण करण्यास आरसीबी यशस्वी ठरली. विराटने 54 बॉलमध्ये 7 चौकार आणि 1 षटकार मारला आणि 73 धावांची तुफानी फलंदाजी केली. आरसीबीने 3 गडी गमावत 159 धावा केल्या आणि या सामन्यात आपला विजय मिळवला.
तर पंजाबने 20 ओव्हरमध्ये 6 गडी गमावत 157 धावा केल्या. या सामन्यात कृणाल पंड्याने श्रेयस अय्यरची हटके कॅच पकडली. मात्र यावेळी विजय मिळवल्यानंतर विराट आणि श्रेयसमध्ये ठिणगी पेटता पेटता राहिली. जितेशने 19 व्या ओव्हरच्या 5 व्या बॉलवर बंगळुरूच्या विजयासाठी जोरदार षटकार खेचला. यानंतर विराटने त्याच्या एनर्जीटीक स्टाईलने सेलीब्रेशन केले. त्यावेळी त्याच्यासमोरच पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यर उभा होता. विराटने केलेल्या कृतीमुळे श्रेयस अय्यर कुठे तरी नाराज झाल्यासारखा वाटत होता.
ज्यावेळी विराट पंजाबच्या खेळाडूंची हस्तांदोलन करण्यासाठी गेला, त्यावेळेस श्रेयस त्याच्यासोबत काही तरी बोलताना दिसला. श्रेयस त्याच्यावर चिडत त्याला दूर करत असल्याच पाहायला मिळालं. मात्र, काही वेळानंतर दोघे ही हसत खेळत एकमेकांसोबत बोलताना दिसले. एवढचं नाही तर दोघांनी एकमेकांची गळाभेट देखील घेतली. त्यामुळे श्रेयस खरोखर विराटवर चिडला होता की त्यांच्यातील भांडण केवळ सामन्यापुरत होतं. याकडे सर्वांच लक्ष लागलेलं होत. मात्र त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हयरल होत आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची प्लेईंग 11
फिप सॉल्ट, विराट कोहली, रजत पाटीदार (कर्णधार), रोमारियो शेपर्ड, जितेश शर्मा, टीम डेव्हिड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड, सुयश शर्मा, यश दयाल.
पंजाब किंग्सची प्लेईंग 11
प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक), प्रियांश आर्य, श्रेयस अय्यर (कर्णधार), जॉश इंग्लिश, नेहाल वढेरा, शशांक सिंग, मार्कस स्टॉयनिस, मार्को यान्सन, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जेवियर बार्टलेट.