नुकताच चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना दुबई येथे पार पडला ज्यात भारताचा विजय झाला. आता क्रिकेटप्रेमींचे पुर्ण लक्ष आयपीएल 2025 स्पर्धेकडे लागलेलं आहे. आयपीएल 2025 स्पर्धा 22 मार्चपासून सुरु होत आहेत. त्यामुळे क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. यादरम्यान अनेक संघातून काही महत्त्वाच्या बातम्या समोर येत आहेत. असं असताना आयपीएल 2025 स्पर्धेचा पहिला सामना होण्याआधीच राजस्थान रॉयल्सचं टेन्शन वाढलं आहे. राजस्थान रॉयल्सचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या पायाला मोठी दुखापत झाली आहे .
प्रशिक्षक राहुल द्रविडला बंगळुरुत क्रिकेट खेळताना त्यांच्या डाव्या पायाला दुखापत झाली होती. ते रिकव्हर होत असून 12 मार्चला जयपूरमध्ये संघासोबत जोडले जातील. ही दुखापत क्रिकेट खेळत असताना झाली असल्याचं म्हटलं जात आहे. याबाबत सविस्तर माहिती राजस्थान रॉयल्सने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट शेअर करत दिली आहे. ज्यात असं लिहलं आहे की, "बंगळुरूमध्ये क्रिकेट खेळताना दुखापत झालेले मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आता बरे होत आहेत आणि आज जयपूरमध्ये आमच्यासोबत सामील होतील".
राहुल द्रविड यांना भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर, राजस्थान रॉयल्सच्या मुख्य प्रशिक्षकपदाची ऑफर मिळाली. त्याआधी राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने आयसीसी टी-20 वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावली होती.
राजस्थान रॉयल्सचा आयपीएल 2025 साठी संपूर्ण संघ :
कर्णधार संजू सॅमसन, यशस्वी जैस्वाल, रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, संदीप शर्मा, जोफ्रा आर्चर, महेश तिक्शाना, वानिंदू हसरंगा, आकाश मधवाल, कुमार कार्तिकेय, नितीश राणा, युधवीर सिंग, फजलहक फारुकी, वैभव सुरयना, क्युवान सुर्वेना, कुमार कार्तिकेय, कुणाल राठोड, अशोक शर्मा, तुषार देशपांडे, शुभम दुबे.