(RCB vs PBKS) अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये अंतिम सामन्यात आरसीबीने पंजाब किंग्सचा पराभव करत आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. आरसीबीने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 190 रन्स केल्या. बंगळुरुनं पंजाबला 191 धावांच्या आव्हान दिलं होते. मात्र पंजाबला 185 धावांचीच मजल मारता आली.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं पंजाबचा पराभव करुन पहिल्यांदाच आयपीएलचं विजेतेपद पटकावलं. 18 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आरसीबीने आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरलं. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्स या सामन्यामध्ये पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विराट कोहलीने फलंदाजीत सर्वाधिक 43 धावा केल्या त्याच्यासोबत जितेश शर्मानेही 24 धावांची खेळी केली.
कॅप्टन रजत पाटीदारने 26 धावा केल्या. सलामीसाठी आलेला फिल सॉल्टने 16 धावा केल्या. त्यानंतर मयंक अग्रवालने 24 धावा केल्या. विराट कोहलीने फलंदाजीत सर्वाधिक 43 धावा केल्या त्याच्यासोबत जितेश शर्मानेही 24 धावांची खेळी केली. लियाम लिव्हिंगस्टोन 25 धावा केल्या. विराट कोहलीसाठी हा क्षण अतिशय भावनिक होता. सामना जिंकताच विराट कोहलीला अश्रू अनावर झाले. आरसीबीच्या या ऐतिहासिक विजयानंतर विराट कोहली जमिनीवर गुडघे टेकून बसला आणि चेहरा खाली करून रडू लागला.