काल एम. चिन्नास्वामी मैदानावर राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघात रंगत पाहायला मिळाली. यादरम्यान राजस्थानने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आरसीबीला प्रथम फलंदाजी करावी लागली. यावेळी आरसीबीकडून पहिल्यांदा विराट कोहली आणि फिल सॉल्ट हे दोघे मैदानात आले.
यामध्ये फिल सॉल्टने 26 धावांची खेळी केली. त्याला साथ देताना विराट कोहलीने 8 चौकार आणि 2 षटकार मारत 70 धावा केल्या. यांच्यामुळे आरसीबीची सुरवातच धडाकेबाज झाली. त्यानंतर देवदत्त पडिक्कलने 50 धावांची खेळी केली. तसेच डेव्हिड 23 आणि जितेश शर्माने 20 धावा चोपल्या. त्याचसोबत आरसीबीची धावसंख्या 205 धावांवर पोहोचवली. यावेळी आरसीबीने विजय मिळवत स्कोअरबोर्डमध्ये झेप घेतली.
याच्याआधी मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात बुधवारी सामना रंगलेला पाहायला मिळाला. यामध्ये मुंबई इंडियन्सने विजय मिळवत तिसऱ्या स्थानी झेप घेतली होती. मात्र राजस्थानला पराभूत बंगळुरूने पुन्हा आपले स्थान कायम ठेवलं आहे. तसेच यावेळी गुजरात टायटन्स 12 गुणांसह या यादीत अव्वल स्थानी आहे. त्याचसोबत दिल्ली कॅपिटल्स हा संघ 12 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. पंजाब किंग्जचा संघ 10 पाचव्या स्थानी आहे. तर राजस्थान रॉयल्स 4 गुणांसह हा संघ आठव्या स्थानी आहे.