सध्या क्रिकेट क्षेत्रात अनेक गोष्टी घटताना पाहायला मिळत आहेत. काही गोड बातम्या तर काही वाईट बातम्या अशातच टीम इंडियाचा धुव्वाधार प्लेअर रिंकू सिंह सध्या चर्चेत येताना पाहायला मिळत आहे. भारताचा स्टार क्रिकेटपटू रिंकू सिंहच्या वैयक्तिक आयुष्याची म्हणजेच त्याच्या लव्ह लाईफमुळे सध्या तो चर्चेत आला आहे.
उत्तरप्रदेशमधील खासदार प्रिया सरोजसोबत तो लग्नगाठ बांधणार असल्याच्या चर्चांना सध्या उधाण आलं आहे. उत्तरप्रदेशच्या खासदार प्रिया सरोज ही वकील तसेच समाजवादी पार्टीची सदस्य आहे. प्रिया सरोज दुसऱ्या क्रमांकाची सर्वात तरुण खासदारही आहे. 2024मध्ये तिने मछली शहरातून लोकसभा निवडणूक लढवली होती. भाजपच्या भोलानाथ सरोज यांना पराभूत करत विजय मिळवला होता.
रिंकू हा 2023मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा टीम इंडियाचा नावाजलेला खेळाडू आहे. नुकतेच इंग्लंडविरुद्ध टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी झालेल्या भारतीय संघाच्या घोषणेत रिंकूचं नाव देखील घेण्यात आलं आहे. भारतीय क्रिकेट संघात रिंकुचा स्ट्राईक रेट 160 पेक्षा जास्त असून आयपीएलमध्ये तो केकेआर संघातून खेळाताना दिसला आहे.
केकेआरकडून खेळताना एका षटकात सलग 5 षटकार ठोकण्याचा विक्रम त्याने केला आहे. तसेच त्याने भारतासाठी 2 वनडे खेळले असून त्यात त्याने 55 धावा केल्या आहेत, तर 1 विकेट घेतली आहे. त्याचसोबत त्याने आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 30 सामन्यांत 507 धावा केल्या तसेच 2 विकेट्स घेतल्या आहेत.