काल इंग्लंड दौऱ्यादरम्यान कसोटी सामन्याचा दुसरा दिवस होता. यावेळी इंग्लंडने दमदार कमबॅक केलं आहे. इंग्लंडने 3 विकेट गमावून 209 धावा केल्या. दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने 359/3 च्या धावसंख्येवरून पुढे खेळायला सुरुवात केली. काल आंतरराष्ट्रीय योग दिन जगभरात साजरा केला जात होता. याचपार्श्वभूमीवर पंतनेही दुसऱ्या दिवशी आपले शतक ठोकताच अनोख सेलीब्रेशन केलं आहे.
रिषभ पंतने 178 बॉलमध्ये 134 धावा करत नाबाद खेळी खेळली. तर त्याने कर्णधार शुभमन गिलला 209 धावांची भागीदारी करुन दिली. यावेळी गिलनेही 227 बॉमध्ये 147 धावांची खेळी खेळली. पंतचं कालचं शतक हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील सातवे शतक असून तो कसोटी सामन्यात सर्वाधिक शतक मारणारा विकेटकिपर बनला आहे. त्याने महेंद्रसिंह धोनीला देखील मागे सोडलं आहे.
यादरम्यान लीड्स कसोटीत इंग्लंडविरुद्ध शतक झळकावल्यानंतर पंतने अनोख्या पद्धतीने सेलिब्रेशन केलं आहे, त्याच्या या सेलिब्रेशनची चर्चा सध्या जोरदार सुरु आहे. शोहेब बशीरच्या ओव्हर वेळी त्याने एका हाताने बॅट पिरवत शतक ठोकलं आणि त्यानंतर त्याने हेल्मेट काढत बॅट जमिनीवर ठेवली. पुढे त्याने कोलांटी उडी मारल्यानंतर कर्णधार शुभमन गिलला मिठी मारली आणि आकाशाकडे पाहत आभार मानले.
त्याच हे सेलिब्रेशन पाहून सुनिल गावसकर यांनी सोनी स्पोर्ट्सवर कॉमेंट्री करताना आश्चर्य व्यक्त केले. यावेळी गावसकर म्हणाले की, " ओहो.., सुपर्ब, सुपर्ब, सुपर्ब.. या युवा खेळाडूकडून दमदार फलंदाजी झळकवण्यात आली आहे", रिषभ पंतचे हे सेलिब्रेशन आणि गावसकर यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.