क्रिकेट

ENG vs IND : पाचव्या कसोटीसाठी दोन्ही टीम जाहीर, टीम इंडियातून 'हा' खेळाडू बाहेर तर इंग्लंडमध्ये ऑलराउंडरचं कमबॅक

पाचव्या कसोटीसाठी दोन्ही टीम जाहीर झाली असून भारतातून महत्त्वाचा खेळाडू बाहेर पडणार आहे. तर इंग्लंडमध्ये ऑलराउंडरचं कमबॅक होणार आहे. यादरम्यान जसप्रीत बुमराह पाचव्या कसोटीसाठी पुन्हा खेळणार की नाही याकडे देखील लक्ष आहे.

Published by : Prachi Nate

इंग्लंड दौऱ्यादरम्यान या कसोटी सामन्यात चार सामने पार पडले असून सध्याची स्थिती 2-1 अशी आहे. नुकताच चौथ्या कसोटीतील शेवटचा सामना मँचेस्टरमध्ये खेळवण्यात आला, हा सामना रविवारी ड्रॉ झाला. पहिल्याच डावात टीम इंडियाने 358 धावा करत इंग्लंडसमोर पहिलं आव्हान ठेवल. हे आव्हान मोडत इंग्लंडने 311 धावांची मजबूत आघाडी घेत, 669 धावा केल्या. चौथ्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी टीम इंडियाने दुसऱ्या डावात 4 गडी गमावून 425 धावा केल्या. इंग्लंड दौऱ्यादरम्यान पाच कसोटी पैकी चार कसोटी सामने पार पडले आहेत. तर आता 31 जुलैपासून या मालिकेतील पाचव्या सामन्याचा थरार लंडनमधील केनिंग्टन ओव्हल येथे रंगणार आहे.

जेमी ओव्हटनची तब्बल 3 वर्षांनंतर एन्ट्री

टीम इंग्लंडने देखील पाचव्या कसोटीसाठी संघ जाहीर केला असून यावेळी त्यांनी एका ऑलराउंडरचा समावेश संघात केला आहे. जेमी ओव्हटन हा तब्बल 3 वर्षांनंतर कसोटी सामन्यासाठी टीम इंग्लंडमध्ये सामील होणार आहे. जेमीने 2022 साली कसोटी पदार्पण केलं होतं. यावेळी त्याने 2 विकेट्ससह 97 धावा करत संघासाठी उत्तम कामगिरी केली. त्यानंतर आता जेमीला इंग्लंड टीम मॅनेजमेंट पाचव्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी दिल्याची माहिती समोर येत आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियावरुन ही माहिती दिली आहे.

ऋषभ पंतची पाचव्या कसोटीतून एक्सिट

टीम इंडियातून संघाचा उपकर्णधार आणि विकेटकीपर ऋषभ पंत हा पाचव्या कसोटी सामन्यातून बाहेर पडणार आहे. टीम इंडियासाठी हा मोठा धक्का असणार आहे. कारण ऋषभ पंतने कसोटी सामन्यात त्याच्या दमदार खेळीने चाहत्यांचे मन जिंकले होते. मात्र त्याला चौथ्या कसोटी सामन्यादरम्यान फटका मारताना पायाला दुखापत झाली. ही दुखापत एवढी गंभीर झाली की, त्याच्या पायाला फ्रॅक्चर कराव लागलं. ज्यामुळे ऋषभ पंतला पाचव्या सामन्यातून बाहेर पडाव लागलं आहे. त्याच्या जागी एन जगदीशन याचा संघात समावेश करण्यात आला आहे.

जसप्रीत बुमराह खेळणार की नाही?

सध्या टीम इंडियामध्ये जस्प्रीत बुमराह पाचवा कसोटी सामना खेळणार की नाही असा प्रश्न उपस्थित राहिला आहे. मालिका सुरु होण्यापूर्वी बुमराह केवळ तीन कसोटी सामने खेळणार हे स्पष्ट झालं होतं. त्यामुळे बुमराह दुसरी कसोटी सोडता पहिल्या, तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीत खेळला. ठरवल्याप्रमाणे त्याचे तीन कसोटी सामने खेळून झाले आहेत. मात्र सध्याची संघाची स्थिती बघता त्याला संघात खेळवण हे महत्त्वाचं ठरणार आहे. आता यासाठी ओव्हल कसोटी सामन्याच्या नाणेफेकीपर्यंत वाट पाहावी लागेल.

टीम इंडिया प्ले 11 :

शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, कुलदीप यादव, अंशुल कंबोज, अर्शदीप सिंग, एन जगदीशन (यष्टीरक्षक).

टीम इंग्लंड प्ले 11 :

बेन स्टोक्स (कर्णधार), जोफ्रा आर्चर, गस अ‍ॅटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, झॅक क्रॉली, लियाम डॉसन, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, ओली पोप, जो रूट, जेमी स्मिथ, जोश टंग आणि ख्रिस वोक्स.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा