नुकत्याच पार पडलेल्या आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने दमदार कामगिरी करत पाकिस्तानला चारीमुंड्या चीत केल. यानंतर आता क्रिकेटप्रेमींसाठी एक मोठी गुडन्यूस समोर आली आहे. टीम इंडियातील नावाजलेली जोडी पुन्हा एकदा निळ्या जर्सीत पाहायला मिळणार आहे.
भारताचे दोन खेळाडू ज्यांनी संपुर्ण जगभरात आपला चाहतावर्ग निर्माण केला आहे, असे विराट कोहली आणि रोहित शर्मा हे निवृत्तीनंतर पुन्हा एकदा क्रिकेटचं मैदान गाजवणार आहेत. त्यामुळे आता तुम्हाला याची उत्सुकता लागली असेल की, क्रिकेटमधील जय-वीरूची जोडी म्हणजेच रोहित आणि विराट हे कधी क्रिकेट खेळताना पाहायला मिळणार आहेत.
रोहित अन् विराट भारतीय संघात परतणार ?
आशिया कपनंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी तयारी करत आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी टी-20 आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यामुळे, हे दोघेही एकदिवसीय क्रिकेट खेळतात. याच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघेही आपली बॅट झळकवताना दिसतील.
दरम्यान भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध पहिली कसोटी मालिका खेळेल. यावेळी केवळ दोनच सामने खेळले जातील, ज्यामध्ये पहिली कसोटी 2-6 ऑक्टोबरला अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियममध्ये खेळली जाईल, तर दुसरी कसोटी 10-14 ऑक्टोबरला दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवली जाईल. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर, टीम इंडिया पुन्ही भारतात परतेल आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 14 नोव्हेंबरपासून टेस्ट मॅच सुरू होईल. त्यानंतर दोन्ही संघांमध्ये वनडे आणि टी 20 मालिका खेळली जाईल.
भारत-ऑस्ट्रेलिया दौरा
पहिला वनडे सामना: 19 ऑक्टोबर (ऑप्टस स्टेडियम)
दुसरा वनडे सामना: 23 ऑक्टोबर (अॅडलेड ओव्हल)
तिसरा वनडे सामना: 25 ऑक्टोबर (एससी ग्राउंड)
पहिला टी-20: 29 ऑक्टोबर (मनुका ओव्हल)
दुसरा टी-20: 31 ऑक्टोबर (एमसीजी)
तिसरा टी-20: 2 नोव्हेंबर (बेलेरिव्ह ओव्हल)
चौथा टी-20: 6 नोव्हेंबर (हेरिटेज बँक स्टेडियम)
पाचवा टी-20: 8 नोव्हेंबर (गब्बा स्टेडियम)
भारत-दक्षिण आफ्रिका दौरा
पहिली टेस्ट: 14-18 नोव्हेंबर (ईडन गार्डन्स)
दुसरी टेस्ट: 22-26 नोव्हेंबर (एसीए स्टेडियम)
पहिली वनडे: 30 नोव्हेंबर (जेएससीए इंटरनॅशनल स्टेडियम)
दुसरी वनडे: 3 डिसेंबर (शहीद वीर नारायण सिंग इंटरनॅशनल स्टेडियम)
तिसरी वनडे: 6 डिसेंबर (एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियम)
पहिली टी-20: 9 डिसेंबर (बारबती स्टेडियम)
दुसरी टी-20: 11 डिसेंबर (पीसीए स्टेडियम)
तिसरी टी-20: 14 डिसेंबर (एचपीसीए स्टेडियम)
चौथी टी-20: 17 डिसेंबर (एकाना स्टेडियम)
पाचवी टी-20: 19 डिसेंबर (नरेंद्र मोदी स्टेडियम)