नुकत्याच झालेल्या बॉर्डर - गावस्कर ट्रॉफी स्पर्धेमध्ये रोहितची कामगिरी चांगली पाहायला मिळाली नाही. ज्यामुळे त्याच्यावर मोठ्याप्रमाणात टीका केल्या जात होत्या.या सिरीजमध्ये रोहित शर्माकडून कर्णधारपदाची जबाबदारी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात अपेक्षा केल्या जात होत्या. मात्र, तो त्या अपेक्षा पुर्ण करण्यासाठी अपुरा ठरला. या सिरीजमधील पहिला सामना जिंकूनही टीम इंडियाला पुढच्या चार सामन्यांमध्ये तीन पराभवांना सामोरं जावं लागलं. दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या टेस्ट सामन्यात रोहितने 5 डावात फलंदाजी केली पण त्याला केवळ 31 धावा करता आल्या.
अशा परिस्थितीत त्याला सिडनी टेस्टमधून वगळलं गेलं होत. ज्यामुळे क्रिकेटप्रेमींकडून त्याच्या खेळीवर नाराजी व्यक्त केली जात होती. दरम्यान 11 जानेवारीला मुंबईत बीसीसीआयची बैठक आयोजित करण्यात आली होती. ज्यात भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार रोहित शर्मा यांना बीसीसीआयने अनेक प्रकारचे प्रश्न विचारले. ज्यामध्ये रोहितने त्याच्या कर्णधारपदाबद्दल आपले मत मांडले आहे.
काय म्हणाला रोहित शर्मा?
रोहित शर्मा म्हणाला की, मी आता काही काळच कर्णधार राहीन त्यामुळे मी बराच काळ टीम इंडियासोबत नसणार आहे, तोपर्यंत पुढील कर्णधाराचा शोध घ्यावा... कर्णधारपदासाठी तुम्ही केलेल्या आगामी निवडीला माझा पुर्ण पाठिंबा असेल.. असं मत रोहितने यावेळी मांडले आहे तर रोहितनंतर आता भारतीय संघाचे नेतृत्व कोण करणार हा विषय चर्चेचा ठरला आहे.