क्रिकेट

IPL 2025 MI Vs CSK : रोहित शर्माला मिळणार नवा सलामीवीर जोडीदार, ईशान किशनच्या जागी 'या' खेळाडूला संधी

IPL 2025 मध्ये मुंबई इंडियन्सला नवा सलामीवीर मिळणार! ईशान किशनच्या जागी कोण खेळणार? जाणून घ्या रोहित शर्माच्या नव्या जोडीदाराबद्दल सविस्तर माहिती.

Published by : Prachi Nate

देशभरात आता क्रिकेट प्रेमींची आयपीएल 2025 ची उत्सुकता शिगेला पोहचलेली आहे. कालपासून आयपीएल 2025 स्पर्धेला सुरुवात झाली. कालचा सामना रॉयल बंगळुरू चॅलेंजर्स आणि कोलकता नाइट रायडर्स यांच्यामध्ये पार पडला. या सामन्यात KKR ने RCB ला 175 धावांचे लक्ष्य दिले होते. RCB ने KKR चा सात विकेट्सने पराभव केला.

आज MI आणि CSK आमनेसामने

आज 23 मार्चला मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियममध्ये संध्याकाळी 7.30 वाजता लढवला जाणार आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे दोन संघ आयपीएलच्या स्पर्धएतील सर्वात यशस्वी संघ आहेत. आयपीएल दरम्यान बहू चर्चेत असलेली टीम म्हणजे मुंबई इंडियन्स, या टीमबद्दल अनेक महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. यावेळी मंबई इंडियन्स या टीमच्या पहिल्या सामन्या दरम्यान हार्दिक पांड्या सामना खेळू शकणार नाही त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात संघाचे नेतृत्त्व स्टार खेळाडू सुर्यकुमार यादव करणार आहे.

टीम मुंबई इंडियन्समध्ये तीन पर्याय

तसेच आयपीएलच्या गेल्या सिझनमध्ये पाहिलं तर रोहितसोबत ईशान किशन हा ओपनिंगचा जोडीदार असायचा. त्या दोघांनी मिळून गेल्यावर्षी आपली सलामीची कामगिरी दाखवली होती. मात्र यावेळी ईशान किशन हा मुंबई इंडियन्स टीमचा भाग नाही तर तो सनराइजर्स हैदराबाद या संघाचा भाग आहे. त्यामुळे रोहित सोबत ओपनिंगला ईशानची जागा कोण घेणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी टीम मुंबई इंडियन्समधून 3 खेळाडूंची नावे समोर आली आहेत. यामध्ये पहिलं नाव रायन रिकेल्टन याचं आहे, रिकेल्टनचा सध्याचा फॉर्म खूपच जबरदस्त असून तो मुंबईला वेगवान सुरुवात करून देऊ शकतो. तर दुसरं नाव विल जॅक्स याचं आहे, रोहितचा ओपनर जोडीदार होण्याच्या शर्यतीत जॅकचं नाव आघाडीवर आहे. तसेच रॉबिन मिंन्झ याचं नाव तिसरं आहे, मिन्झने देशांतर्गत क्रिकेटमध्ये आक्रमक फलंदाजासह हार्ड हिटिंगसाठी ओळखला जातो.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा