Arjun Tendulkar Engagement 
क्रिकेट

Arjun Tendulkar Engagement : अर्जुन तेंडुलकरने गुपचूप उरकला साखरपुडा?

भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर याचा मुलगा क्रिकेटपटू अर्जुन तेंडुलकर याचा साखरपुडा झाल्याची चर्चा रंगली आहे.

Published by : Team Lokshahi

(Arjun Tendulkar Engagement) भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर याचा मुलगा क्रिकेटपटू अर्जुन तेंडुलकर याचा साखरपुडा झाल्याची चर्चा रंगली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अर्जुनचा साखरपुडा मुंबईतील प्रख्यात उद्योगपती रवी घई यांची नात सानिया चंडोकसोबत झाल्याचे समजते.

दोन्ही कुटुंबातील निवडक सदस्य आणि जवळचे मित्रच या कार्यक्रमाला उपस्थित असल्याची माहिती मिळत आहे. अर्जुन आणि सानियाचा साखरपुडा एका खाजगी समारंभात पार पडल. सानिया अर्जुनची बालपणीची मैत्रीण आहे. घई इंटरकॉन्टिनेंटल मरीन ड्राइव्ह हॉटेल आणि ब्रुकलिन क्रीमरीचे मालक आहेत.

अर्जुन तेंडुलकरने आतापर्यंत मुंबई इंडियन्ससाठी एकूण पाच सामने खेळले आहेत. अर्जुनने 2023 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले. अर्जुन तेंडुलकरचा साखरपुडा झाल्याची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे. मात्र, तेंडुलकर आणि चंडोक कुटुंबीयांनी यावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा