क्रिकेट

Asia Cup 2025 India vs Pakistan : भारताला डिवचण्याचा प्रयत्न ठरला असफल; गन आणि प्लेनच क्रॅश सेलिब्रेशन करणाऱ्या फरहान-रौफचा असा जिरवला चाहत्यांनी माज

भारत- पाकिस्तान सामन्यात पाकिस्तान संघातील खेळाडूंचा माजोरडेपणा पाहायला मिळाला. पाकिस्तानच्या दोन खेळाडूंनी केलेल्या कृतीमुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये चांगलाच राग उफाळून आला आहे.

Published by : Prachi Nate

भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यात भारताचा दणदणीत विजय झाला आहे. भारताच्या या विजयामुळे पाकिस्तानला सलग दुसऱ्या सामन्यात हार पत्करावी लागली. या सामन्यादरम्यान पाकिस्तान संघातील खेळाडूंचा माजोरडेपणा पाहायला मिळाला. पाकिस्तानच्या दोन खेळाडूंनी केलेल्या कृतीमुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये चांगलाच राग उफाळून आला आहे. पाकिस्तानचा सलामीवीर साहिबझादा फरहानने 34 चेंडूत अर्धशतक ठोकल्यानंतर बॅट बंदुकीसारखी धरत गोळ्या झाडल्याची अ‍ॅक्शन केली.

दरम्यान साहिबझादा फरहान याने 58 धावा केल्या. त्याने केलेलं सेलीब्रेशन सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असून सोशल मीडियावर संताप पाहायला मिळत आहे. असं असताना दुसरीकडे हारिस रौफने प्लेन पाडण्याची ॲक्शन केली. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या आठवणी अद्याप ताज्या असताना या सेलिब्रेशनवर संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेवर अनेकांच्या प्रतिकिया येत असून त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

यानंतर हारिस रौफ सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असातना टीम इंडियाला सपोर्ट करणाऱ्या क्रिकेटप्रेमींनी विराटच्या नावाचा जयघोष करत हारिस रौफला जागा दाखवली आणि त्याचा माज उतरवलेला पाहायला मिळाला. क्रिकेटप्रेमींचा जयघोष ऐकून त्याने कानावर हात ठेवत काहीच न ऐकल्यासारखं केलं, पण त्याच्या तोंडावरचा रंग उडालेला पाहायला मिळाला. हरिस रौफने 4 ओव्हरमध्ये 26 धावा देत 2 बळी घेतले.

टीम इंडियाकडून पाकिस्तानचा दारुण पराभव

भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यात भारताचा दणदणीत विजय झाला आहे. आशिया कप सुपर फोर सामन्यात भारताने दुबईत पाकिस्तानचा दणदणीत पराभव केला असून भारतीय फलंदाजांनी दमदार खेळी करत पाकिस्तानचा धुव्वा उडवल्याचे पाहायला मिळाले. टॉस जिंकून भारताने गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.

पाकिस्तानने भारताला विजयासाठी 172 धावांचं आव्हान दिलं होतं. भारताने 18.5 ओव्हरमध्ये 174 धावा करत सामना 6 विकेट्सने जिंकला. अभिषेक शर्मा आणि शुबमन गिल या सलामी जोडीच्या जबरदस्त कामगिरीसोबतच हार्दिक पंड्या, तिलक वर्मा, संजू सॅमसन या तिघांनीही चांगली बॅटिंग केली.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा