क्रिकेट

MI Vs LSG IPL 2025 : पलटन आता ऐकत नाही..., दणदणीत विजयानंतर MIच्या कर्णधाराची मालकीणीसोबत सेल्फी

आयपीएल 2025:MI Vs LSG सामन्यात मुंबई इंडियन्सच्या विजयानंतर हार्दिक पांड्याचा मालकीण नीता अंबानीसोबत सेल्फी व्हायरल.

Published by : Prachi Nate

आयपीएलमध्ये प्रत्येक सामन्यात तसेच सामन्याच्या विजयादरम्यान आणि पराभवादरम्यान खेळाडूंची काही तरी मुव्हमेंट कॅप्चर होते. असाच एक प्रकार मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स या सामन्यानंतर पाहायला मिळाला. मुंबईने या सामन्यामध्ये 54 धावांसह लखनऊवर मात केली. यानंतर मुंबईच्या पलटनचा आनंद काहीसा औरचं होता. यादरम्यान मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या याने चक्क संघाच्या मालकीनीसोबत सेल्फी काढला आहे.

यादरम्यानचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच हा व्हिडिओ मुंबई इंडियन्सने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केला आहे. तसेच यावर कॅप्शन देताना म्हटलं आहे की, "आमच्या सर्वात गोंडस आणि मोठ्या आवाजातील चाहत्यांसोबतचा एक उत्कृष्ट इनिंगचा सेल्फी ". या व्हिडिओवर चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

काल मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात लखनऊने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी मुंबईने प्रथम गोलंदाजी करत लखनऊला 216 धावांच आव्हान दिल, तर दुसरीकडे लखनऊ मुंबईने दिलेल्या धावांचा पाठलाग करत 161 धावा करु शकलं.

यादरम्यान मुंबईचा हार्डेस्ट गोलंदाज जसप्रीत बुमराहने 4 विकेट्स घेतल्या. त्यामुळे मुंबईच्या विजयामध्ये बुमराहचं मोठ योगदान आहे. मुंबई इंडियन्स सलग पाचवा विजय आपल्या नावे कोरला आहे तर लखनऊचा दुसरा पराभव आहे. या विजयासह मुंबईने पॉईंट्स टेबलमध्ये दुसरे स्थान गाठले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Meenatai Thackeray Statue : मीनाताई ठाकरे पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपी अटकेत

Latest Marathi News Update live : मीनाताई ठाकरे पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपी अटकेत

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींनी घाईघाईने निर्णय घेऊ नका, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Kiran Kale Shivsena UBT : ठाकरेंच्या शिवसेनेच्या किरण काळेंवर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?