नुकताच आयपीएल 2025 खेळल्यानंतर मुंबई इंडियन्स आणि टीम इंडियाचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादववर अलीकडेच शस्त्रक्रिया झाली आहे. तो बेंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये मैदानावर परतण्यासाठी त्याच्या तंदुरुस्तीवर काम करत आहे. अशातच सूर्यकुमार यादवची एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान गाजत आहे.
भारतीय महिला संघाची अष्टपैलू श्रेयंका पाटील आणि सूर्यकुमार यादव यांनी 'ऑरा फार्मिंग' ट्रेंड फॉलो केल्याचं पाहायला मिळत आहे. जिममध्ये दोघेही एका मूव्हीटेक 4×4 डॉलीवर 'ऑरा फार्मिंग' ट्रेंड करताना व्हिडिओमध्ये दिसत आहेत.
यावेळी सूर्यकुमार यादव हा पुढे उभा आहे तर श्रेयंका पाटील मागे बसलेली पाहायला मिळत आहे. सूर्यकुमारने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, 'मॅनेजरने सागितलं ट्रेंड करायच, तर करायचं '. यावेळी दोघांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे.
ऑरा फार्मिंग हा ट्रेंड एका 11 वर्षीय आशियाई मुलाने बोट रेस दरम्यान सुरु केला. रेयान अर्खान असं त्या मुलाच नाव असून तो बोट रेस दरम्यान बोटीच्या पुढच्या बाजूला त्याच्या एनर्जी आणि डान्स मूव्हजने सर्वांचे लक्ष वेधून घेतो. हा ट्रेंट सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेक जण हा ट्रेंड फॉलो करताना दिसले, अशातच सूर्यकुमार यादव देखील हे डान्स चॅलेंज करताना दिसला.