क्रिकेट

Shreyas Iyer : श्रेयस अय्यर ICU मध्ये; बरगडीच्या गंभीर दुखापतीनंतर अंतर्गत रक्तस्रावाची माहिती

भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार श्रेयस अय्यर याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनीत झालेल्या तिसऱ्या सामन्यात गंभीर दुखापत झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Published by : Varsha Bhasmare

थोडक्यात

  • श्रेयस अय्यरच्या चाहत्यांची चिंता वाढली

  • बरगडीच्या गंभीर दुखापतीनंतर अंतर्गत रक्तस्रावाची माहिती

  • सध्या सिडनीतील रुग्णालयाच्या ICU मध्ये उपचार सुरु

भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार श्रेयस अय्यर याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनीत झालेल्या तिसऱ्या सामन्यात गंभीर दुखापत झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उंच उडी घेत शानदार कॅच घेताना त्याच्या डाव्या बरगडीवर तीव्र मार बसला आणि त्या दरम्यान त्याला झालेल्या इजा अधिक गंभीर असल्याचे पुढील तपासणीत समोर आले.

सामन्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये परतताच श्रेयसच्या जीवनावश्यक संकेतांमध्ये असामान्यता दिसू लागली. त्यानंतर बीसीसीआयच्या वैद्यकीय टीमने तातडीने उपचार सुरू केले आणि कोणताही धोका न घेता त्याला तत्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. तपासणीत अंतर्गत रक्तस्राव झाल्याचे निदान झाले असून तो सध्या सिडनीतील रुग्णालयाच्या ICU मध्ये उपचार घेत आहे.

संबंधित सूत्रांनी सांगितले की, श्रेयस पुढील दोन ते सात दिवस निरीक्षणाखाली राहणार आहे. रक्तस्रावामुळे संसर्गाचा धोका वाढू नये म्हणून अतिरिक्त काळजी घेतली जात आहे. परिस्थिती सध्या स्थिर असली तरी, त्वरित हॉस्पिटलाईझेशन झाले नसते तर प्रसंग अधिक गंभीर ठरू शकला असता, अशी माहिती समोर आली आहे.

या दुखापतीमुळे श्रेयस अय्यरला पुन्हा मैदानात केव्हा उतरता येईल, याबाबत ठोस कालमर्यादा सांगणे सध्या शक्य नाही. फिटनेस आणि पुनर्वसन प्रक्रियेस अधिक वेळ लागू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आगामी मालिकेत त्याचा सहभाग अनिश्चित मानला जात आहे.

श्रेयस अय्यर सध्या T20 संघाचा भाग नसल्यामुळे भारतात परतीचा निर्णय वैद्यकीय स्थिती सुधारल्यानंतरच घेतला जाईल. डॉक्टरांच्या मते, त्याला किमान एक आठवडा रुग्णालयात राहणे आवश्यक आहे, त्यानंतरच प्रवासाला परवानगी मिळू शकते. भारतीय संघ व्यवस्थापन आणि संघसहकाऱ्यांनी श्रेयसच्या प्रकृत्तीवर लक्ष ठेवले असून, तो लवकर बरा होईल अशी आशा व्यक्त केली आहे. भारतीय चाहत्यांमध्येही त्याच्या आरोग्याबाबत चिंतेचे वातावरण आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा