Anderson Tendulkar Trophy 
क्रिकेट

Anderson Tendulkar Trophy : Sunil Gavaskar : अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी नावावर सुनील गावस्करांचं मोठं वक्तव्य, केली 'ही' मोठी मागणी

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेचं नाव आता ‘अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी’ असं ठेवण्यात आलं.

Published by : Team Lokshahi

Anderson Tendulkar Trophy : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेचं नाव आता ‘अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी’ असं ठेवण्यात आलं असून, इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन आणि भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर यांच्या योगदानाचा सन्मान म्हणून हे नाव देण्यात आलं आहे. मात्र, या नव्या नावावर भारताचे माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांनी आक्षेप नोंदवला आहे.

गावस्कर यांनी म्हटलं आहे की, ट्रॉफीचं नाव ‘तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफी’ असावं. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाला (ECB) नाव देण्याचा अधिकार आहे, परंतु भारतीय चाहत्यांसाठी सचिन तेंडुलकरच्या आधी अँडरसनचं नाव पाहणं अयोग्य वाटू शकतं. तेंडुलकर हे अँडरसनपेक्षा 12 वर्षांनी वरिष्ठ असून, त्यांनी कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे. त्यांनी सर्वाधिक धावा आणि शतके केली असून, 2011 चा विश्वचषकही जिंकलेला आहे.

'अँडरसन हा कसोटी क्रिकेटमधील अव्वल गोलंदाज असला तरी त्याचा परदेशातील विक्रमी कामगिरी आणि एकदिवसीय क्रिकेटमधील योगदान तेंडुलकरच्या तोडीचं नाही. अँडरसन कसोटी क्रिकेटमध्ये विकेट घेणाऱ्यांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि त्याचा रेकॉर्ड एकदिवसीय क्रिकेटमध्ये तेंडुलकरइतका चांगला नाही. यासोबतच त्यांनी भारतीय चाहत्यांना तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफी म्हणण्यास सांगितले आहे.

पूर्वी इंग्लंडमधील मालिका 'पतौडी ट्रॉफी' या नावाने ओळखली जात होती, तर भारतातील सामने 'अँथनी डी मेलो ट्रॉफी'अंतर्गत खेळवले जायचे. आता दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डांनी मिळून ही एकसंध ट्रॉफी सुरू केली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा