महापालिका निवडणुकांची घोषणा होताच राज्यातील राजकारण ढवळून निघाले. तिकीट न मिळाल्याने अनेक इच्छुकांनी पक्ष बदलले, तर काहींना ऐनवेळी उमेदवारी मिळाल्याने जुन्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली. या सगळ्या घडामोडींमध्ये भाजपमध्ये सर्वाधिक नव्या चेहऱ्यांची भर पडली. मुंबईत एकीकडे भाजप–शिंदे गटाची आघाडी होती, तर दुसरीकडे ठाकरे गट, मनसे आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) एकत्र लढताना दिसले. मात्र या युतीमुळे अनेकांच्या राजकीय आशा मावळल्या.
याच पार्श्वभूमीवर सहर शेख या नावाची चर्चा रंगली. राष्ट्रवादीकडून संधी न मिळाल्यानंतर त्यांनी एमआयएमची वाट धरली. मुंब्र्यात, जो जितेंद्र आव्हाड यांचा मजबूत भाग मानला जातो, तिथे सहर शेख यांनी धक्कादायक विजय मिळवला. विजयानंतर केलेल्या वक्तव्यामुळे त्या अधिकच चर्चेत आल्या.
मात्र पुढील एका विधानाने वाद निर्माण झाला. त्यांच्या बोलण्यामुळे सामाजिक तणाव निर्माण होऊ शकतो, असा आक्षेप घेत पोलिसांनी सहर शेख आणि त्यांचे वडील यांना नोटीस पाठवली आहे. सार्वजनिक आणि सोशल मीडियावर बोलताना संयम बाळगण्याचा इशाराही देण्यात आला आहे. या प्रकरणामुळे राजकीय विजयासोबतच नवा वादही उफाळून आला आहे.
थोडक्यात
• महापालिका निवडणुकांची घोषणा होताच राज्यातील राजकारण ढवळून निघाले.
• तिकीट न मिळाल्याने अनेक इच्छुकांनी पक्षांतर केले.
• ऐनवेळी उमेदवारी मिळाल्याने जुन्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी
• या घडामोडींमध्ये भाजपमध्ये सर्वाधिक नव्या चेहऱ्यांची भर
• मुंबईत भाजप–शिंदे गटाची आघाडी मैदानात...
• दुसऱ्या बाजूला ठाकरे गट, मनसे आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) एकत्र
• या युतीमुळे अनेक नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या राजकीय आशा मावळल्या.