क्रिकेट

Rohit Sharma Retirement : रोहित शर्मानं केली कसोटी क्रिकेटमधून तात्काळ निवृत्तीची घोषणा

भारताचा कर्णधार रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तात्काळ निवृत्तीची घोषणा केली.

Published by : Prachi Nate

भारतीय संघाचा कर्णधार आणि सर्वात नावाजलेला खेळाडू रोहित शर्मा याने कसोटी क्रिकेटमधून तात्काळ निवृत्तीची घोषणा केली आहे. क्रिकेट चाहत्यांचा आवडता हिटमॅन म्हणून ओळखला जाणारा रोहित शर्मा याच्या कसोटी कर्णधारपदावरून काढून टाकल्याच्या चर्चा आणि बातम्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना पाहायला मिळत होत. यादरम्यान काही मिनिटांतच भारताचा कर्णधार रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तात्काळ निवृत्तीची घोषणा केली.

अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील बीसीसीआयच्या वरिष्ठ निवड समितीने आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी रोहित शर्माला भारताच्या कसोटी कर्णधारपदावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. रोहित शर्मा त्याच्या तुफानी खेळीमुळे एकदिवसीय कर्णधार म्हणून नेहमीच पाहायला मिळाला आहे. मात्र रोहितचा फॉर्म सध्या वेळोवेळी घसरत चालेला पाहायला मिळत आहे.

रोहितच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडविरुद्ध आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या गेल्या सहा कसोटींपैकी पाच कसोटी सामन्यांमध्ये भारताला पराभवाला सामोरे जावे लागले. एवढच नव्हे तर कसोटी क्रिकेटमध्ये वाईट फॉर्ममधून जात असलेल्या रोहितने सिडनीतील शेवटच्या कसोटी सामन्यात देखील स्वतःला संघातून वगळलेले पाहायला मिळाले. त्याच्या सध्याच्या रेड-बॉल फॉर्ममुळे बीसीसीआयचे वरिष्ठ निवडकर्ते त्याला कर्णधारपदावर ठेवण्यास ठामपणे तयार नसल्याची माहिती समोर आली आहे.

निवडकर्त्यांनी अनेक बैठका घेतल्या असून त्यातील शेवटची बैठक मुंबईत कसोटी संघासाठी रोडमॅप तयार करण्यासाठी झाली. रोहितने स्वतः ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्कसोबत पॉडकास्टमध्ये इंग्लंडमध्ये भारताचे नेतृत्व करण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निवडकर्त्यांनी अनेक बैठका घेतल्या असून त्यातील शेवटची बैठक मुंबईत कसोटी संघासाठी रोडमॅप तयार करण्यासाठी झाली. रोहितच्या निवृत्तीच्या निर्णयाबाबत निवडकर्त्यांनी बीसीसीआयला आधीच कळवले असून त्यांच्या निर्णयाला वरिष्ठ बोर्ड अधिकाऱ्यांनी देखील पाठिंबा दिला आहे. रोहितने स्वतः ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्कसोबत पॉडकास्टमध्ये इंग्लंडमध्ये भारताचे नेतृत्व करण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर ही घटना घडली आहे.

रोहित शर्माने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला स्टोरी शेअर करत म्हटलं आहे की," सर्वांना नमस्कार, मी फक्त एवढेच सांगू इच्छितो की मी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत आहे. पांढऱ्या संघात माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करणे हा एक पूर्ण सन्मान आहे. गेल्या काही वर्षांपासून मिळालेल्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद. मी एकदिवसीय क्रिकेटमध्येही प्रतिनिधित्व करत राहीन".

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा