क्रिकेट

Asia Cup 2025 : भारताचा पाकिस्तानला दणका! एशिया कपसाठी BCCI ची नवी रणनीती

भारत आणि पाकिस्तानमधील ह्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियाने एशिया कप 2025 मधून माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

Published by : Prachi Nate

पाकिस्तानने पहलगाममध्ये दहशदवादी हल्ला केल्यानंतर भारताने त्यांना ऑपेरेशन सिंदूर द्वारे चोख उत्तर दिले. ह्यामध्ये भारत पाकिस्तान मध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. भारत आणि पाकिस्तानमधील ह्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियाने एशिया कप 2025 मधून माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. बीसीसीईने तसा आपला निर्णय एशियन क्रिकेट कौन्सिलला (ACC) कळवला आहे. सप्टेंबर 2025 मध्ये हा विश्वचषक खेळवला जाणार आहे.

मात्र भारत जूनमध्ये श्रीलंकेत होणाऱ्या महिला इमर्जिंग एशिया कप आणि सप्टेंबरमध्ये होणाऱ्या पुरुष एशिया कपमध्ये सहभागी होण्यास नकार दिल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. यामुळे आशिया कपचे आयोजन धोक्यात आले आहे. मात्र, याबाबतचा अधिकृत पुष्टी बीसीसीआयने केलेली नाही. ACC चे सध्याचे अध्यक्ष मोहसिन नकवी हे पाकिस्तानचे मंत्री आहेत, त्यामुळे भारत त्यांच्या अध्यक्षतेखालील स्पर्धांमध्ये सहभागी होणार नसल्याचे BCCI च्या एका अधिकाऱ्याने सांगितले. तसेच युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानला क्रिकेट जगतात एकटं पाडण्यासाठीच हा निर्णय घेतल्याचं समजत आहे.

भारत पाकिस्तान युद्ध जरी संपले असले तरी देशातील तणाव अजून निवळला नाही. पाकिस्तानच्या कुरापतीमुळे संपूर्ण जग चिंतीत आहे. भारतातही पाकिस्तानविरोधातील रोष उफाळून आला आहे. त्याचा परिणाम आता क्रिकेट क्षेत्रावरही दिसू लागला आहे.बीसीसीआयच्या या निर्णयाचा क्रिकेट जगताला आणि पर्यायाने पाकिस्तानलाही मोठा झटका बसणार असल्याचं सांगितलं जात आहे. भारतीय संघ आगामी मेन्स आशिया कप 2025 खेळणार नाही. तसेच या कपचं यजमानपदही स्वीकारणार नाही, असं भारतीय क्रिकेट नियंत्रण बोर्ड (बीसीसीआय) ने एशियन क्रिकेट कौन्सिलला (एसीसी) कळवल्याची माहिती आहे.

तसेच भारत वूमेन्स इमर्जिंग टिम्स आशिया कप 2025मध्ये भाग घेणार नाही. हा कप पुढच्या महिन्यात श्रीलंकेत होणार आहे. भारतच या टुर्नामेंटमध्ये भाग घेणार नसल्याने वूमेन्स इमर्जिंग टिम्स आशिया कप रद्द करण्यात आला आहे.पाकिस्तानने भारतावर केलेल्या दहशदवादी हल्ल्यामुळे बीसीसीआयही आता पाकिस्तानला मोठा दणका देण्याच्या तयारीत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.मात्र BCCI च्या या निर्णयामुळे एशिया कप 2025 रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मागील वेळी Asia Cup पाकिस्तानात झाला होता, परंतु BCCI ने आपला संघ पाकिस्तानात पाठवण्यास नकार दिला होता, त्यामुळे स्पर्धा 'हायब्रीड मॉडेल'वर खेळवण्यात आली होती. भारतीय संघाने सुरक्षेच्या कारणास्तव आपले सर्व सामने श्रीलंकेत खेळले होते. मात्र आता यामधून भारताने माघार घेतल्यामुळे "एशिया कप 2025" होणार की नाही याबाबत शंका व्यक्त केली जात आहे .

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींना आनंदाची बातमी मिळणार, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Mumbai Rain Alert : मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर वाढला, हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी

Mahua Moitra On Amit Shah : "अमित शाह यांचे शीर कापून टेबलावर ठेवायला हवे"; TMC खासदार महुआ मोइत्रा यांचं वादग्रस्त वक्त्तव्य

BCCI India vs Pakistan : "तर मी पाकिस्तानविरुद्ध खेळलो..." पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान सामना व्हावा की नाही? माजी भारतीय खेळाडूच्या मताने वेधल लक्ष