टीम इंडियाचे दिग्गज खेळाडू कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली हे क्रिकेट विश्वातील नावाजलेले खेळाडू आहे. त्याचसोबत दोघांचाही चाहतावर्ग जगभरात पाहायला मिळातो. या दोघांनी एकत्रित टी20 आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे ते दोघे आता फक्त वनडे क्रिकेट खेळार आहेत. 2027 मध्ये सुरु होणाऱ्या वनडे क्रिकेट समान्यासाठी दोघांनी ही खेळण्यासाठी इच्छा व्यक्त केली आहे.
तर दुसरीकडे 19 ऑक्टोबरपासून टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. यावेळी पहिला सामना 19 ऑक्टोबरला पर्थ असणार आहे तर दुसरा सामना 23 ऑक्टोबरला एडिलेडमध्ये असणार आहे, आणि अखेरची तिसरा सामना 25 ऑक्टोबरला सिडनीमध्ये होणार आहे. याचपार्श्वभूमिवर विराट आणि रोहित यांच्या चाहत्यांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, 2027 च्या वनडे वर्ल्ड कपसाठी बीसीसीआय तरुणांना संधी देण्याची शक्यता आसल्याचं बीसीसीआयने सांगितलं आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात होणाऱ्या एक दिवसीय मालिकेतील सामने विराट आणि रोहितच्या करिअरचे अखेरचे सामने ठरू शकतात.
त्याचसोबत कदाचित हे दोन्ही खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वीच हा आपला शेवटचा एकदिवसीय सामना मालिका असल्याचे घोषीत करतील, अशी शक्यता ही बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने व्यक्त केली. मात्र याविषयीची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.