3-06-2025 रोजी तब्बल 17 वर्षांची प्रतिक्षा संपवून, 3 वेळा फायनलमध्ये आलेल्या आरसीबीला आणि विराटला 18 व्या वर्षी यश मिळालं. अखेर त्याच्या देखील हातात आयपीएलची ट्रॉफी झळकताना पाहायला मिळाली. यादरम्यान बंगळुरुमध्ये आरसीबीची विजयी मिरवणुकी काढण्यात आली होती. बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडीयमध्ये विजयी मिरवणूक काढण्यात आली असून यावेळी आरसीबीच्या विजयी मिरवणुकीत चेंगराचेंगरीचा प्रकार झाला.
या चेंगराचेंगरीत 60 जण जखमी झाले असून या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. चिन्नास्वामी स्टेडीयबाहेर काही फॅन्स झाडावर चढले असून मुख्यमंत्री सिद्धारमै्यया रुग्णालयात जखमींना दाखल केलं होत. यानंतर आरसीबीला आणि विराट कोहलीला विजयानंतर देखील प्रचंड ट्रोलिंगला सामोरे जावे लागले.
यानंतर आता चेंगराचेंगरीत मृत्यु झालेल्या मृतांच्या नातेवाईकांना कर्नाटक सरकार नुकसान भरपाई देणार आहे. कर्नाटक सरकारने पीडितांना 10 लाख रुपये देण्याची घोषणा केली होती, मात्र आता या रकमेत वाढ केली आहे. मृतांच्या नातेवाईकांना आता 25 लाख रुपयांची भरपाई रक्कम देण्याचे आदेश मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिले आहेत.