सध्या सुरु असलेल्या इंग्लंड दौऱ्यादरम्यान या कसोटी सामन्यात चार सामने पार पडले असून सध्याची स्थिती 2-1 अशी आहे. नुकताच चौथ्या कसोटीतील शेवटचा सामना मँचेस्टरमध्ये खेळवण्यात आला, हा सामना रविवारी ड्रॉ झाला. यावेळी नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने लागला, ज्यामुळे भारताला प्रथम फलंदाजी करावी लागली. यावेळी प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाचे सर्व गडी पहिल्याच डावात 358 धावा करत आपल्या तंबूत माघारी फिरले. त्यानंतर टीम इंडियाचं हे आव्हान मोडत इंग्लंडने 311 धावांची मजबूत आघाडी घेत, 669 धावा केल्या.
यादरम्यान टीम इंडियाकडून केएल राहुल-शुभमन गिल आणि रविंद्र जडेजा-वॉशिंग्टन सुंदर यांच्या जोडीने शतकी भागीदारी करत इंग्लंडची कंबर मोडली. सुरुवातीला असं वाटत होत की, हा डाव देखील इंग्लंड घेऊन जाणार. मात्र टीम इंडियाच्या शिलेदारांनी इंग्लंडचा हा डाव मोडून लावला. सुरुवातीला दुसऱ्या डावात टीम इंडियाकडून यशस्वी जयस्वाल आणि साई सुदर्शन यांची खराब सुरुवात पाहायला मिळाली. हे दोघेही पहिल्या ओव्हरमध्येच माघारी फिरले.
यानंतर शुभमन गिल आणि केएल राहुलची भागीदारी बेन स्टोक्सने तोडली. या दोघांनी 421 बॉलमध्ये 188 धावा केल्या. यादरम्यान केएल राहुलने 230 बॉलमध्ये 90 धावा केल्या तर शुभमन गिलने 238 बॉलमध्ये 103 धावांची खेळी केली. त्याचसोबत वॉशिंग्टन सुंदरने 101 धावा केल्या आणि त्याला भागीदारी करत रविंद्र जडेजाने 107 धावा केल्या. चौथ्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी टीम इंडियाने 4 गडी गमावून 425 धावा केल्या. ज्यामुळे चौथ्या कसोटीतील शेवटचा सामना ड्रॉ झाला असला तरी त्याचा फायदा टीम इंडियाला झाला आहे.
भारताच्या चांगल्या फलंदाजीमुळे इंग्लंड संघाचं मालिका विजयाचं स्वप्न अपुरे राहिलं. याचपार्शवभूमीवर इंग्लंड दौऱ्यादरम्यान पाच कसोटी पैकी चार कसोटी सामने पार पडले आहेत. यादरम्यान सध्याची 2-1 ची स्थिती पाहता जर टीम इंडियाने पाचवा कसोटी सामना जिंकला तर ही मालिका ड्रॉ होईल. त्याचसोबत जर इंग्लंडने हा सामना जिंकला तर 3-1 ने इंग्लंड ही मालिका जिंकतील