क्रिकेट

Digvesh Rathi LSG : दिग्वेश राठीच्या अनोख्या सेलिब्रेशनचा उलघडा, विकेट घेतल्यानंतर जमिनीवर लिहण्याचे कारण स्वतः केलं स्पष्ट

दिग्वेश राठीच्या अनोख्या सेलिब्रेशनचा रहस्य उलगडले, विकेट घेतल्यानंतर जमिनीवर लिहण्याचे कारण स्पष्ट.

Published by : Prachi Nate

सध्या आयपीएलचा महासंग्राम पाहायला मिळत आहे. सामन्यादरम्यान प्रत्येक संघातून अनेक बातम्या देखील कानावर पडत आहेत. आयपीएलमध्ये विजय मिळवल्यावर तसेच कोणत्याही गोष्टीचे सेलिब्रेशन करण्याची प्रत्येक खेळाडूची आपली आपली अशी हटके स्टाईल आहे. या हटके स्टाईलने तो खेळाडू समोरच्या प्रतिस्पर्धी खेळाडूला डिवचण्याचा प्रयत्न करतो. असं असताना अनोख्या सेलिब्रेशनच्या बाबतीत सध्या दिग्वेश राठी हे नाव चर्चेत आलेलं पाहायला मिळत आहे. विकेट घेतल्यानंतर दिग्वेश राठी हा त्याच्या स्टाईलने सेलिब्रेशन करतो आणि तेच त्याला अनेक वेळा महागात पडताना पहाायल मिळालेलं आहे. आयपीएलदरम्यान विकेट घेतल्यानंतर सेलीब्रेशन केल्याने त्याला थेट दंड ठोठावण्यात आला.

दिग्वेश राठीचा सेलिब्रेशन करण्याचा अंदाज

दिग्वेश राठी हा लखनऊ सुपर जायंट्स या संघाकडून खेळतो. तो प्रत्येक विकेटवर आपल्या हातावर वही समजून काहीतरी लिहिण्याची एक्टिंग करतो. त्याच्या सेलिब्रेशन अंदाजाला नोटबूक सेलिब्रेशन असं म्हटलं जातं. पण आता त्याने त्याच्या या स्टाईलमध्ये काही बदल केल आहेत. आता तो हातावर न लिहता जमिनीवर लिहायची एक्टिंग करतो. पंजाबविरुद्धच्या सामन्यात त्याने प्रियांश आर्यला आऊट केल्यानंतर नोटबुक सेलीब्रेशन केलं होतं. त्यानंतर त्याच्यावर दंड ठोठावल्यापासून त्याने हे बदल केले.

दिग्वेश राठीने स्पष्ट केलं कारण

याबद्दल स्पष्टीकरण देताना तो म्हणाला की, "प्रियांश आणि मी आम्ही दोघ एकमेकांचे खुप चांगले मित्र आहोत. ज्यावेळी आमचा संघ आमनेसामने येणार होता त्यावेळेस आम्ही ठरवलं होत की, जर त्याने जास्त धावा केल्या तर मी असं सेलिब्रेशन करेन. त्याचसोबत जर मी त्याला आऊट केलं तर मी असं सेलिब्रेशन करेन. त्यानंतर मी सेलिब्रेशनच्या वेळी मी काहीही लिहिलं नाही. बीसीसीआयचे जे काही नियम असतात त्याला आपण विरोध करु शकत नाही. त्यामुळे मी आता हातावर न लिहता आता जमिनीवर फलंदाजाचं नाव लिहितो. पण मी नेमकं काय लिहतो हे एक गुपित आहे आणि मला ते गुपितचं ठेवायचं आहे. मी सुरुवातीला फलंदाजी करायचो मात्र ते करत असताना मी थकून जायचो. त्यानंतर मी एकदा सुनील नसरीन यांची गोलंदाजी पाहिली आणि तो नकल बॉल टाकायचा. मी सुद्धा त्याप्रमाणे एक नकल बॉल टाकण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मस्करीत घेतलेली गोष्ट आता माझं प्रोफेशनल झालं आहे", असं दिग्वेश राठीने स्पष्ट केलं आहे.

लखनऊ सुपर जायंट्स प्लेईंग 11 :

एडन मार्करम, निकोलस पूरन, ऋषभ पंत (कर्णधार आणि विकेटकीपर), हिम्मत सिंग, डेव्हिड मिलर, अब्दुल समद, शार्दुल ठाकूर, आकाश दीप, दिग्वेश सिंग राठी, आवेश खान आणि रवी बिश्नोई.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Disha Patani : अभिनेत्री दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींचा एन्काऊंटर

Gajanan Mehendale : ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे यांचे निधन

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांचा 'चलो दिल्ली'चा नारा

Latest Marathi News Update live : राज्यात आज ॲलोपॅथी डॉक्टरांचा संप