आयपीएलच्या 18 व्या हंगामात आज पहिल्यांदा चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर बंगळूरु आमनेसामने येणार आहेत. एकीकडे चेन्नईने सुरुवातीचा सामना जिंकून आपलं खात उघडलं होत. तर दुसरीकडे बंगळुरुने देखील त्यांचा पहिला सामना जिंकला होता. आता हे दोन्ही संघ आज चेन्नईतील चेपॉकच्या मैदानावर भिडणार आहेत. हा सामना आज संध्याकाळी 7:30 वाजता पार पडणार आहे. मुंबई इंडियन्सचा पराभव करून ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली चेन्नईने 158 धावांसह हा सामना जिंकला होता. तर दुसरीकडे बंगळुरुने कोलकताला 177 धावा करत परभूत केलं होत. त्यामुळे आयपीएल 2025 स्पर्धेत आज आणखी एक हाय व्हॉल्टेज सामना पाहायला मिळणार आहे.
चेन्नईतील वातावरण कसं असेल?
चेन्नईमध्ये या सामन्यावेळी तापमान 30 डिग्री सेल्सिअस इतकं असल्यामुळे या सामन्यादरम्यान वातावरण साफ राहणार असून पाऊस पडणार नाही. त्यामुळे या दोन्ही संघाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. चेन्नईतील चेपॉक मैदान गोलंदाजांसाठी नेहमीच फायदेशीर ठरतो. तर या मैदानावर मोठे फटके खेळता येत कठीण पडतं. त्यामुळे कोणता संघ बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
चेन्नईचा स्टार गोलंदाज दुखापतग्रस्त
चेन्नईचा श्रीलंका येथील उजव्या हाताचा वेगवान स्टार गोलंदाज मथिशा पाथिराना हा चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स या चेन्नई्च्या पहिल्या सामन्यात खेळताना पाहायला मिळाला नाही. आयपीएल 2025 च्या सुरुवातीपासूनच पाथिराना दुखापतग्रस्त आहे. त्यामुळे तो आतापर्यंत झालेल्या चेन्नईच्या सामन्यात दिसला नाही. याशिवाय पाथिराना 2024 च्या गेल्या सिझनमध्ये शेवटच्या काही सामन्यांनाही मुकला होता. चेन्नई सुपर किंग्जचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी एक मोठी माहिती दिली आहे की, पाथिराना त्याच्या दुखापतीतून बरा होतो आहे मात्र, आरसीबीविरुद्ध खेळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे चेन्नईच्या संघासोबतच चेन्नईच्या चाहत्यांसाठी देखील ही चिंत्तेची बाब आहे. गेल्या सिझनमध्ये त्याच्या उत्कृष्ट कामगिरीनंतर चेन्नईने आयपीएल 2025 साठी पाथिरानाला 13 कोटींसह रिटेन केलं होतं.
दोन्ही संघांची प्लेईंग 11
चेन्नई सुपर किंग्ज: ऋतुराज गायकवाड (कर्णधार), एमएस धोनी (विकेटकीपर), रचिन रवींद्र, राहुल त्रिपाठी, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, सॅम करन, रविचंद्रन अश्विन, नूर अहमद, नॅथन एलिस किंवा मथिशा पाथिराना आणि खलील अहमद.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: रजत पाटीदार (कर्णधार), फिल सॉल्ट (विकेटकीपर), विराट कोहली, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, टिम डेव्हिड, कृणाल पंड्या, रसिक दार सलाम किंवा भुवनेश्वर कुमार, सुयश शर्मा, जॉश हेजलवुड, यश दयाल.