क्रिकेट

Australia Cricketer : स्विंगच्या बादशाहाची तडकाफडकी निवृत्ती! टी-20 वर्ल्ड कपपूर्वीच 'या' खेळाडूने केला इंटरनॅशनल क्रिकेटला रामराम

ऑस्ट्रेलियाच्या अनुभवी वेगवान गोलंदाजने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. 2026 मध्ये होणाऱ्या पुढील टी-20 वर्ल्डकपपूर्वी त्याने निवृत्ती जाहीर करत सर्वांना आश्चर्यचकित केले.

Published by : Prachi Nate

(Mitchell Starc) ऑस्ट्रेलियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. 2026 मध्ये होणाऱ्या पुढील टी-20 वर्ल्डकपपूर्वी त्याने निवृत्ती जाहीर करत सर्वांना आश्चर्यचकित केले. 2021 मध्ये टी-20 वर्ल्डकप जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाचा तो महत्त्वाचा भाग होता, तर 2024 च्या वर्ल्डकपमध्येही त्याने चमकदार कामगिरी केली होती.

स्टार्कने स्पष्ट केले की त्याचा भर आता कसोटी आणि वनडे क्रिकेटवर असेल. त्याने सांगितले की, मोठ्या स्पर्धांमध्ये सातत्याने खेळण्यासाठी शरीर तंदुरुस्त राखणे आवश्यक आहे. त्यामुळे टेस्ट, वनडे आणि आयपीएलसारख्या फ्रँचायझी लीगमध्ये खेळण्यावर तो लक्ष केंद्रीत करणार आहे.

निवृत्तीबाबत बोलताना स्टार्कने सांगितले की टेस्ट क्रिकेट त्याच्यासाठी नेहमीच सर्वोच्च प्राधान्य राहिले आहे. 2021 च्या टी-20 वर्ल्डकपमधील विजय त्याच्या कारकिर्दीतील विशेष क्षण ठरला. मात्र, पुढील ॲशेज मालिका आणि 2027 च्या वनडे वर्ल्डकपसाठी स्वतःला सज्ज ठेवण्याचा निर्णय त्याने घेतला आहे.

टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत स्टार्कने 65 सामने खेळले आणि 79 विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियासाठी या स्वरूपात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. ॲडम झम्पा त्याच्या पुढे असून त्याच्या नावावर 130 बळी आहेत. स्टार्कच्या या निर्णयामुळे ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजी विभागात बदल होणार असला तरी तो आयपीएलसारख्या स्पर्धांमध्ये चाहत्यांना पाहायला मिळत राहणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Nagpur Emergency landing : विमानाला पक्षी धडकल्यानं विमानाचं इमर्जन्सी लैंडिंग

CM Devendra Fadnavis : मराठा समाजाचा हिताचा तोडगा निघाला, फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

Pravin Darekar X Post : देवाभाऊंचा मास्टरस्ट्रोक ! देरकरांकडून फडणवीसांचं कौतुक

Manoj Jarange Maratha Protest : मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण यशस्वी; मराठा समाजाच्या सहा मागण्या मान्य