क्रिकेटप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आशिया कप 2025 स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर झालं असून 9 ते 28 सप्टेंबर दरम्यान हे थरारक सामने रंगणार आहेत. यादरम्यान टीम इंडियाची गाजलेली जोडी रोहित शर्मा आणि विराट कोहली हे एकत्र कमबॅक करणार होते. यामुळे क्रिकेटप्रेमींचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.
कारण रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनीही कसोटी सामन्यातून एका मागोमाग एक निवृत्ती घेतली. ज्यामुळे हे दोघे ही सध्या सुरु असलेल्या इंग्लंड दौऱ्यावरील सामन्यात खेळताना पाहायला मिळाले नाही. इंग्लंड दौऱ्यावर असलेली टीम इंडिया पाचव्या कसोटीसाठी आपले चांगले प्रदर्शन देण्यासाठी प्रयत्न करत आहे. यानंतर टीम इंडिया बांगलादेश दौऱ्यात टी 20i आणि वनडे सीरिज खेळणार होती.
या वनडे सीरिज दरम्यान देखील रोहित शर्मा आणि विराट कोहली हे एकत्र खेळताना दिसणार होते. मात्र या दौऱ्याला स्थगित करण्यात आल्यामुळे ही जोडी आणखी काही महिने क्रिकेटपासून लांब राहणार आहे. त्याचसोबत क्रिकेटप्रेमींसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आहे, विराट आणि रोहितला आगामी आशिया कप 2025 स्पर्धेतही खेळता येणार नाही. यामुळे विराट आणि रोहितच्या चाहत्यांना मोठा धक्का बसणार आहे.
नेमकं कारण काय?
यामगचं कारण असं आहे की, यंदा 2026 टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आशिया कप स्पर्धा टी 20 फॉर्मेटनुसार खेळवण्यात येणार आहे. तसेच 2024 च्या वर्ल्ड कप विजयानंतर विराट आणि रोहित या दोघांनीही टी 20i क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यामुळे आशिया कप स्पर्धा टी 20 फॉर्मेटनुसार खेळवण्यात येणार असल्यामुळे विराट-रोहित दोघांना देखील आगामी आशिया कप स्पर्धा खेळता येणार नाही.