आयपीएलमधील प्ले-ऑफसाठी गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स या संघांची निवड झाली आहे. यादरम्यान मागील काही सामन्यांमध्ये गुजरात, बंगळुरू आणि पंजाब या संघांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे याचा फायदा मुंबईच्या पलटनला झाल्याचं पाहायला मिळत आहे. टॉप 4 नंतर आता चारही संघामध्ये टॉप 2 ची शर्यत लागलेली पाहायला मिळत आहे.
कारण टॉप 2 मध्ये एन्ट्री करणाऱ्या संघाला अंतिम फेरी गाठण्याची संधी मिळते. मात्र टॉप 2 मध्ये कोणते संघ खेळणार हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान आतापर्यंत झालेले सामने पाहता मुंबई इंडियन्सकडे टॉप 2 मध्ये जाण्यासाठी जास्त संधी आहेत. मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज सामन्यानंतर टॉप 2 मध्ये कोणते 2 संघ प्रवेश करणार हे कळणार आहे, मात्र यासाठी त्यांना काय कराव लागणार हे जाणून घ्या.
गुजरातने आतापर्यंत 13 सामन्यांमध्ये 18 गुणांसह प्रथम क्रमांकावर असून शेवटचा सामना जिंकून गुजरात 20 गुणांसह अव्वल स्थानावर पोहचेल. त्याचसोबत पंजाबने 13 सामन्यांमध्ये 17 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि बंगळुरू 13 सामन्यांमध्ये 17 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर मुंबई इंडियन्स 13 सामन्यांमध्ये 16 गुणांसह चौथ्या स्थानी आहे.
तर बंगळुरूला शेवटचा सामना जिंकून पहिल्या किंवा दुसऱ्या स्थानी पोहोचू शकतो. जर मुंबईला अव्वल स्थानी पोहचायचं असेल तर शेवटच्या सामन्यात पंजाब किंग्जला पराभूत कराव लागेल. तसेच गुजरात आणि बंगळुरूचा पराभव होणं मुंबईसाठी फायद्याचं ठरणार आहे. गुजरातच्या पराभवानंतरही मुंबईचा संघ पंजाबला पराभूत करून टॉप 2 मध्ये प्रवेश करू शकतो.