क्रिकेट

Team India : एकदिवसीय फॉर्मेटमध्ये शुभमन गिल याच्याकडे संघाची धुरा सोपवली जाणार ?

गेल्या अनेक वर्षांपासून कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे यशस्वीपणे नेतृत्त्व करणारा आणि टीम इंडियाला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या रोहित शर्मा याला आता कर्णधारपदावरुन पायउतार व्हावे लागणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा पुन्हा एकदा भारतीय संघात समावेश होणार आहे.

Published by : Team Lokshahi

थोडक्यात

  • रोहित शर्माचं वनडेतील कर्णधारपद जाणार ?

  • रोहित आणि विराट खेळाडू म्हणून खेळणार?

  • भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं संपूर्ण वेळापत्रक

गेल्या अनेक वर्षांपासून कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे यशस्वीपणे नेतृत्त्व करणारा आणि टीम इंडियाला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या रोहित शर्मा याला आता कर्णधारपदावरुन पायउतार व्हावे लागणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा पुन्हा एकदा भारतीय संघात समावेश होणार आहे. मात्र, रोहित शर्मा याला कर्णधारपद सोडावे लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याच्याऐवजी शुभमन गिल याच्याकडे संघाची धुरा सोपवली जाईल. त्यामुळे कसोटी क्रिकेटप्रमाणे आता एकदिवसीय फॉर्मेटमध्येही शुभमन पर्वाचा आरंभ होणार आहे.

रोहित आणि विराट खेळाडू म्हणून खेळणार?

इंडियन एक्सप्रेसनुसार, रोहित शर्मा आणि विराट कोहली एकदिवसीय संघाचा भाग असतील, परंतु कर्णधारपद गिलकडे जाऊ शकते. हे भारतीय क्रिकेटविश्वातील मोठे स्थित्यंतर ठरणार आहे. म्हणजे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांना स्थान मिळणार आहे. आतापर्यंत हे दोन्ही खेळाडू संघाचा आधारस्तंभ होते. मात्र, आता त्यांना एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

या दोघांना शुभमन गिलच्या नेतृत्त्वाखाली आणि युवा खेळाडुंचा भरणा असलेल्या भारतीय संघात खेळावे लागणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द आता अस्ताकडे चालली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियावरुद्धची एकदिवसीय मालिका कदाचित त्यांची शेवटची संधी असू शकते. या शेवटच्या मालिकेत विराट कोहली आणि रोहित शर्मा हे संस्मरणीय कामगिरी करुन आपल्या कारकीर्दीचा गोड शेवट करतील, अशी अपेक्षा त्यांच्या चाहत्यांना आहे.

ही मालिका 19 ऑक्टोबरपासून सुरू होणार

2027 च्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत ते खेळू शकतील की नाही हे त्यांच्या परतीच्या फॉर्मवर अवलंबून असेल. भारतीय संघ 19 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिकेला सुरुवात करेल. दुसरा एकदिवसीय सामना 23 ऑक्टोबर रोजी आणि तिसरा सामना 25 ऑक्टोबर रोजी खेळला जाईल. त्यानंतर 29 ऑक्टोबरपासून पाच सामन्यांची टी-20 मालिका सुरू होईल.

भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं संपूर्ण वेळापत्रक (India Australia Tour Schedule)

वनडे मालिकेचं वेळापत्रक

19 ऑक्टोबर - पहिली वनडे (पर्थ)

23 ऑक्टोबर- दुसरी वनडे (एडिलेड)

25 ऑक्टोबर- तिसरी वनडे (सिडनी)

पाच सामन्यांची टी 20 मालिका

29 ऑक्टोबर - पहिली टी20 (कॅनबेरा)

31 ऑक्टोबर - दुसरी टी20 (मेलबर्न)

2 नोव्हेंबर - तिसरी टी20 (होबार्ट)

6 नोव्हेंबर - चौथी टी20 (गोल्ड कोस्ट)

8 नोव्हेंबर - पाचवी टी20 (ब्रिसबेन)

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा