भारतीय क्रिकेटर्समध्ये अनेक चर्चांना उधाण आल्यांच पाहायला मिळत आहे, अशातच आता भारताचा माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पा याने एक खळबळजनक विधान केले आहे. लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत उथप्पा म्हणाला की, विराट कोहलीने युवराज सिंगला निवृत्ती घेण्यास भाग पाडले. यामुळे विराटच्या चाहते्यांची माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पा याच्यावर नाराजी पाहायला मिळत आहे.
2007 च्या टी 20 विश्वचषकाच्या भारतीय संघातही युवराज सिंग होता. ज्यावेळेस 2011 मध्ये भारताने विश्वचषक जिंकला होता त्यावेळेस युवराज सिंगने फलंदाजीसह गोलंदाजीमध्ये स्वतःचे पुरेपुर योगदान देत 'मॅन ऑफ द मॅच' ठरला होता. मात्र यानंतर युवराज कॅन्सर सारख्या आजाराला समोरा जात होता.
याचपार्श्वभूमीवर आता लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत उथप्पा म्हणाला की, कॅन्सरसारख्या आजाराशी लढल्यानंतर युवराज सिंग पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये कमबॅक करणार होता. जेव्हा विराट कोहली संघाचा कर्णधार होता, तेव्हा युवराज सिंगाला अपेक्षित सहकार्य मिळाले नाही. विराटने त्याला सपोर्ट केला नाही. युवराजने फिटनेस चाचणीच्या स्तरांमध्ये दोन गुणांची सवलत मागितले होते.
मात्र विराटने त्याची ती विनंती फेटाळली... मात्र दोन गुणांची सवलत न मिळाल्यानंतरही युवराजने फिटनेस टेस्ट पास केली. त्याला संघात घेण्यात आले. पण एका सामन्यात युवराजचा फॉर्म खराब झाला आणि त्यामुळे विराट कर्णधार असल्यामुळे विराटच्या मतानुसार त्याला बाजूला करण्यात आले. ज्यामुळे पुढे त्याला कमबॅक करण्याची संधी देखील मिळाली नाही, असं वक्तव्य रॉबिन उथप्पा याने केलं आहे.